मुंबई : आयपीएल 2021 मध्ये आरसीबी आपला चांगला खेळ दाखवत आहे. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही अप्रतिम आहे. त्यांच्या यशाचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे ग्लेन मॅक्सवेलची जोरदार फलंदाजी. पॉईंट्स टेबलमध्येही विराटचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मॅक्सवेल सध्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे रॉयल चॅलेंजर्सने आजपर्यंत एकही सामना हरलेला नाही.
आज मॅक्सवेल समोर चेन्नई सुपर किंग्ज असणार आहे. त्यामुळे आज आरसीबीच्या विजयाचा सर्वात मोठा मंत्र असलेला खेळाडू चालणार नाही. आम्ही हे म्हणत आहोत कारण धोनी आज यासाठी रवींद्र जडेजाला मोठी जबाबदारी सोपवू शकतो.
आयपीएल 2021 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना होईल तेव्हा दोन्ही संघांचे लक्ष त्यांचा विजय कायम राखण्यावर असेल. पहिला सामना हरल्यानंतर सीएसकेने विजयाची हॅटट्रिक केली आहे, तसेच आरसीबीने त्यांचे सर्व 4 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत संघाचा विजयी क्रम मोडला जाईल. त्यामुळे दोन्ही संघ आता प्रयत्नात आहे. आता सीएसकेला जिंकण्यासाठी मॅक्सवेलचा खेळ खराब करावा लागेल.
मॅक्सवेलचा खेळ खराब करण्यासाठी धोनी आज रवींद्र जडेजाला वापरू शकतो. कारण मॅक्सवेलविरूद्ध जडेजाचा गोलंदाजीचा रेकॅार्ड उत्तम आहे. आतापर्यंत जडेजा आणि मॅक्सवेलने 11 टी -20 चा सामना एकत्र खेळला आहे. यापैकी जडेजाने मॅक्सवेलचा 5 वेळा विकेट घेतला आणि त्याची सरासरी केवळ 11.6 आहे.
मॅक्सवेलने पहिल्या 4 सामन्यांच्या 3 डावांमध्ये 2 अर्धशतकांसह 176 धावा केल्या आहेत. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट सुमारे 150 म्हणजेच 149.15 इतका झाला आहे. मॅक्सवेल सीझनमध्ये आरसीबीकडून सगळ्यात जास्त धावा केलेला खेळाडू आहेत. आता धोनीलाही ठाऊक आहे की, 3 डावांपैकी २ डावात अर्धशतक ठोकणारा हा खेळाडूला थांबवले नाही तर त्याला पराभवाचा धोका असू शकतो. हेच कारण आहे की आज तो जाडेजाला मॅक्सवेलविरूद्ध वापरू शकतो.