IPL 2020: KXIP आणि DC च्या 'या' खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी ?

 भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता मॅच सुरु होईल. 

Updated: Oct 20, 2020, 05:38 PM IST
IPL 2020: KXIP आणि DC च्या 'या' खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी ? title=

दुबई : मुंबई इंडीयन्स विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात विजय मिळवल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचे मनोधैर्य वाढलेय. पण सातत्याने यश मिळवत राहणे कठीण असलेल्या या टीमसाठी पुढे देखील मोठ आव्हान आहे. आज पंजाबची मॅच दिल्ली कॅपीटल्ससोबत होणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर दोन्ही टीम आमनेसामने येतील. भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता मॅच सुरु होईल. याआधी दोन्ही टीमच्या मॅचचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये झाला होता. ज्यामध्ये दिल्लीने पंजाबवर मात केली होती. 

दिल्लीसाठी हा सिझन चांगला सुरु आहे. पण पंजाबसाठी असं बोललं जाऊ शकत नाही. आयपील १३ मध्ये दिल्लीने ९ मॅच खेळल्या असून ७ मध्ये विजय मिळवलाय आणि पॉईंट टेबलच्या सर्वोच्च स्थानी आहेत. दुसरीकडे पंजाबच्या टीमने ९ पैकी ६ सामन्यात हार पत्करलीय आणि ७ व्या स्थानावर आहेत. पंजाबने मागच्या दोन मॅच जिंकल्याने त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब 

बंगळूरविरुद्ध कॅप्टन  लोकेश राहुल आणि क्रिस गेल यांनी चांगली खेळी केली होती. मुंबईविरोधात राहुलची बॅट देखील तळपलेली दिसली. सलामी फलंदाज मयांक अग्रवाल देखील फॉर्ममध्ये आहे. इथेच पंजाबची बॅटींग संपत नाही हे टीमला लक्षात ठेवायला हवं. ग्लेन मॅक्सवेल सतत अयशस्वी होऊनही मॅचमध्ये दिसतोय. तर काही चांगले खेळाडू बाहेर आहेत जे मॅक्सवेलची कमी पूर्ण करु शकतात. 

बॉलिंगमध्ये मोहम्मद शमी आणि रवि बिश्नोईने चांगली कामगिरी केलीय. याशिवाय अर्शदीप सिंहने देखील चांगली बॉलिंग केलीय. 

पंजाबमध्ये खेळाडुंची वैयक्तिक कामगिरी चांगली राहीलीय पण टीम म्हणून खेळताना तसे दृश्य दिसत नाही. त्यामुळेच टीम विजयापर्यंत पोहोचत नाही. टीमचे इतर खेळाडू राहुल, मयांक, गेल, शमी, बिश्नोई यांनी साथ देणं महत्वाचं आहे. 

किंग्स इलेवन पंजाबची संभाव्य प्लेइंग इलेवन: लोकेश राहुल (कॅप्टन), मयांक अग्रवाल, क्रिस गेल, ग्लेन मैक्सवेल, निकोलस पूरन,दीपक हुड्डा, क्रिस जॉर्डन,  मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी.

किंग्स इलेवन पंजाबची पूर्ण टीम: लोकेश राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, करुण नायर, सरफराज खान, ग्लेन मैक्सवेल, निकोलस पूरन, कृष्णाप्पा गौतम, क्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, क्रिस गेल, मनदीप सिंह, हरडस विजोलेन, दीपक हुड्डा, हरप्रीत ब्ररार, मुजीब उर रहमान, दर्शन नालकंडे, जेम्स नीशाम, ईशान पोरेल, प्रभसिमरन सिंह, जगदीश सुचित, तेजिंदर सिंह.

दिल्ली टीम 

ऋषभ पंतला दुखापत झाल्याने दिल्लीच्या टीमला झटका बसलाय. पण सलामी फलंदाज शिखर धवनने सलग तीन वेळा सुंदर फलंदाजी करत पंतची कमी पूर्ण केली. गेल्या मॅचमध्ये धवनने आपल्या आयपीएल करियरमधील पहीले शतक झळकावले आणि चेन्नई विरोधात टीमला विजय मिळवून दिला. 

पृथ्वी शॉ, कॅप्टन श्रेयश अय्यर देखील फॉर्ममध्ये आहेत. काही मॅचमध्ये शॉ लवकर आऊट झाला. पण आता तो चांगली खेळी करण्याच्या प्रयत्नात असेल. पंतच्या जागी आलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य राहणे अद्याप खेळ दाखवू शकला नाहीय. त्याचा परफॉर्मन्स टीमसाठी चिंतेचा विषय बनलाय. शेवटी मार्क्स स्टोयनिस, एलेक्स कैरी आणि शिमरन हेटमायेर मोठे शॉट्स खेळू शकतात.

बॉलिंगमध्ये कैगिसो रबाडा आणि एनरिक नॉखियाची जोडी जमली आहे. तुषार देशपांडेच्या रुपात दोघांना चांगला साथीदार मिळालाय. स्पिनचे डिपार्टमेंट रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलची जोडी छान पद्धतीने संभाळतेय.

दिल्ली कैपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेवन: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोयनिस, एलेक्स कैरी, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे, कैगिसो रबादा, एनरिक नॉर्खिया.

दिल्ली कैपिटल्सची पूर्ण टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, एलेक्स कैरी, जेसन रॉय, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिखर धवन, शिमरन हेटमायेर, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोयनिस, कीमो पॉल, आवेश खान, हर्षल पटेल, कैगिसो रबादा, मोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, संदीप लामिछाने, एनरिक नॉर्खिया, तुषार देशपांडे