IPL 2020 : ...आणि धोनी पंचांवर भडकला

व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Updated: Oct 14, 2020, 08:45 AM IST
IPL 2020 : ...आणि धोनी पंचांवर भडकला title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दुबईमध्ये होत असणाऱ्या आयपीएल 2020 IPL 2020 या क्रिकेच स्पर्धेच्या 29 व्या सामन्यात चेन्नईचा संघानं हैदराबादच्या संघावर मात केली. शेन वॉटसनच्या 42 आणि अम्बाती रायुडूच्या 41 धावांच्या बळावर आणि अर्थातच गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर संघाननं हैदराबादला 20 धावांनी नमवलं. 

नाणेफेक जिंकत चेन्नईच्या संघानं सहा गडी गमावत 167 धावा केल्या. संघाच्या वतीनं मैदानात आलेल्या रवींद्र जाडेजा यानं अखेरच्या दहा चेंडूंमध्ये तीन चौकार आणि सहा षटकार मारत 25 धावांचं योगदान दिलं. चेन्नईच्या संघानं दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करत हैदराबादचे खेळाडू मैदानात उतरले. पण, या संघाला अवघ्या 147 धावांवरच डाव गुंडाळावा लागला. 

एकिकडे सामन्यात चेन्नईचा विजय झाला आणि अर्थातच क्रीडारसिकांचा उत्साह परमोच्च शिखरावर पोहोचला. सामन्यातील अनेक क्षणांची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. पण, सर्वाधिक विषयाला वाव मिळाला तो म्हणजे धोनीचा संताप. 19 व्या षटकामध्ये पंच Paul Rafiel यांच्या निर्णयावर धोनीनं नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर संताप स्पष्टपणे पाहायला मिळाला. 

 

ही घटना तेव्हाची, जेव्हा 19व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शार्दुलनं राशिद खानचा स्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकला. ज्यावर पंचांनी वाईड बॉलचा इशारा देण्यासाठी हात उचलले. पण, विकेटमागे उभ्या असणाऱ्या धोनीचा चेहरा त्याचवेळी पाहण्याजोगा होता. ज्यानंतर पंचांनी चक्क तो चेंडू वाईड दिला नाही. पंचांचं हे वागणं पाहून डग आऊटमध्ये असणाऱ्या डेव्हिड वॉर्नरलाही धक्का बसला. त्यांनंही क्षणातच स्पष्ट नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक मीम्स व्हायरल झाले. अनेकांनी तर, धोनीवरही नाराजी व्यक्त केली. तर, काहींनी पंचांना निशाणा केल्याचं पाहायला मिळालं.