IPL 2019: बुमराहचं थेट कर्णधारालाच आव्हान, विराटचंही सडेतोड प्रत्युत्तर

आयसीसीच्या टेस्ट आणि वनडे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Updated: Feb 28, 2019, 09:48 PM IST
IPL 2019: बुमराहचं थेट कर्णधारालाच आव्हान, विराटचंही सडेतोड प्रत्युत्तर title=

मुंबई : आयसीसीच्या टेस्ट आणि वनडे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर जसप्रीत बुमराह हा वनडे क्रमवारीत बॉलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये आयपीएल सुरु होण्याआधी जुंपलेली असल्याचं पाहायला मिळालं. आयपीएलच्या एका प्रोमोमध्ये जसप्रीत बुमराहनं थेट विराट कोहलीला आव्हान दिलं. तर विराटनंही बुमराहला सडेतोड उत्तर दिलं.

'जगातला नंबर १ बॉलर, अजून नाही. अजून जगातल्या नंबर १ बॅट्समनला बोल्ड करायचं आहे. चिकू भय्या मी येतोय, आणि यावेळी तू माझ्या टीममध्येही नाहीस.' असं बुमराह या प्रोमोमध्ये म्हणतोय.

तर बुमराहच्या या आव्हानाला विराटनंही प्रत्युत्तर दिलं आहे. 'चिकू भय्या? आता स्वत:च्या कर्णधाराला स्लेज करणार? शेवटी तू शिकलासच. पण चिकू भय्याकडून उधारीची अपेक्षा ठेवू नकोस', असं विराट म्हणाला आहे.

आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह मुंबईच्या टीमकडून खेळतो. तर विराट कोहली हा बंगळुरूच्या टीमचा कर्णधार आहे. २३ मार्चपासून आयपीएलच्या १२व्या मोसमाला सुरुवात होईल. या मोसमाची पहिली मॅच चेन्नई आणि बंगळुरूमध्ये होईल. चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पहिला सामना खेळवला जाईल.