हैदराबाद : पंजाब विरुद्ध हैदराबाद यांच्यात २९ एप्रिलला सामना खेळण्यात आला. या सामन्यात हैदराबादने पंजाबचा ४५ रनने पराभव केला. यामॅच दरम्यान पंजाबच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड झाला आहे. आयपीएलच्या इतिहासातील अशा प्रकारचा पहिलाच विक्रम होण्याची पहिलीच वेळ. पंजाबकडून बॉलिंग करणाऱ्या पहिल्या २ बॉलर्सच्या नावे हा रेकॉर्ड झाला आहे. अर्शदीप सिंह आणि मुजीब ऊर रहमान या बॉर्लसच्या नावे हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये घडला.
एखाद्या टीमकडून बॉलिंग करताना पहिल्या दोन बॉलर्सने सर्वाधिक रन देण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड आहे. या दोघांनी १०० पेक्षा अधिक रनची खैरात केली. दोघांनी मिळून एकूण १०८ रन दिल्या. यात अर्शदीपने ४ ओव्हरमध्ये ४२ रन दिल्या. यात १ विकेट देखील त्याने घेतली. तर मुजीब ऊर रहमानने ४ ओव्हरमध्ये ६६ रन लुटवल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही.
हैदराबादने पंजाबला विजयासाठी २१३ रनचे आव्हान दिले. पंजाबला या प्रत्युतरात ८ विकेट गमवून फक्त १६७ रनच करता आल्या. पंजाबकडून सलामीच्या लोकेश राहुलने सर्वाधिक ७९ रन ठोकल्या. यात ४ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. लोकेश राहुलचा अपवाद वगळता इतर कोणत्याच खेळा़डूला निर्णायक खेळी करता आली नाही.
याआधीपंजाबने टॉस जिंकून हैदराबादला खेळण्यासाठी भाग पाडले. हैदराबादने निर्धारित २० ओव्हरमध्ये २१२ रन केल्या. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५६ बॉलमध्ये ८१ रनची खेळी केली. यात त्याने ७ फोर आणि २ सिक्स ठोकले. तर मनिष पांडे आणि ऋद्धीमान सहा या दोघांनी उपयुक्त खेळी केली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादला २० ओव्हरमध्ये २१२ रन करता आल्या.
प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी फार चुरस पाहायला मिळत आहे. दिल्ली आणि चेन्नईच्या टीम प्लेऑफमध्ये आधीच पोहोचल्या आहेत. अशामुळे आता प्ले-ऑफसाठी फक्त दोन जागाच आहेत. आणि २ जागांसाठी चक्क ५ टीम आपली दावेदारी ठोकून आहेत. परंतु या ५ पैकी मुंबईचा अपवाद वगळता पंजाब. हैदराबाद, राजस्थान आणि कोलकाता या टीममध्ये टक्कर असणार आहे. त्यामुळे प्ले-ऑफमध्ये कोणती टीम येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.