IPL 2019: वादळी खेळीसोबतच कायरन पोलार्डने केली ही रेकॉर्ड

पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कायरन पोलार्डने केलेल्या वादळी खेळीमुळे मुंबईचा ३ विकेटने विजय झाला.

Updated: Apr 11, 2019, 09:22 PM IST
IPL 2019: वादळी खेळीसोबतच कायरन पोलार्डने केली ही रेकॉर्ड title=

मुंबई : पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कायरन पोलार्डने केलेल्या वादळी खेळीमुळे मुंबईचा ३ विकेटने विजय झाला. पोलार्डने ३१ बॉलमध्ये ८३ रनची वादळी खेळी केली. यामध्ये १० सिक्स आणि ३ फोरचा समावेश होता. पोलार्डने ही विस्फोटक खेळी केली असली, तरी मोक्याच्या क्षणी पोलार्ड आऊट झाला. अखेर अल्झारी जोसेफ आणि राहुल चहरने मुंबईचा विजय खेचून आणला. मुंबईला शेवटच्या बॉलवर २ रनची गरज असताना अल्झारी जोसेफनं २ रन काढून मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. पोलार्डच्या नेतृत्वात मुंबईने पंजाबने ठेवलेल्या १९८ रनच्या आव्हानाचा पाठलाग शेवटच्या बॉलवर केला. या विस्फोटक खेळीबरोबरच पोलार्डने अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली.

पोलार्डची रेकॉर्ड

- पोलार्डने या खेळीमध्ये १० सिक्स लगावले. मुंबईकडून एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

मुंबईकडून सर्वाधिक सिक्स 

सनथ जयसूर्या- ११ सिक्स- मुंबई विरुद्ध चेन्नई- मुंबई, २००८

कायरन पोलार्ड- १० सिक्स- मुंबई विरुद्ध पंजाब- मुंबई, २०१९ 

कायरन पोलार्ड- ८ सिक्स- मुंबई विरुद्ध हैदराबाद- मुंबई, २०१३

नितीश राणा- ७ सिक्स- मुंबई विरुद्ध पंजाब- इंदूर, २०१७

कर्णधारपदाच्या पदार्पणातच एवढा स्कोअर करणारा पोलार्ड हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

कर्णधारपदाच्या पदार्पणातील सर्वाधिक स्कोअर 

श्रेयस अय्यर- नाबाद ९३ रन- दिल्ली विरुद्ध कोलकाता- दिल्ली, २०१८

कायरन पोलार्ड- ८३ रन- मुंबई विरुद्ध पंजाब- मुंबई, २०१९

एरॉन फिंच- ६४ रन- पुणे विरुद्ध पंजाब- मोहाली, २०१३ 

मुरली विजय- ५५ रन- पंजाब विरुद्ध गुजरात- राजकोट, २०१६

आव्हानाचा पाठलाग करतानाचा मुंबईचा हा दुसरा सगळ्यात मोठा विजय आहे. 

आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची कामगिरी 

१९९ रन- पंजाबविरुद्ध, इंदूर, २०१७ 

१९८ रन- पंजाबविरुद्ध, मुंबई २०१९

१९० रन- राजस्थानविरुद्ध, मुंबई, २०१४

पोलार्डच्या टी-२० क्रिकेटमध्ये ६०२ सिक्स झाल्या आहेत. या यादीत पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांमध्ये क्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. 

टी-२०मध्ये सर्वाधिक सिक्स 

क्रिस गेल- ९२५ सिक्स 

कायरन पोलार्ड- ६०२ सिक्स 

ब्रॅण्डन मॅक्कलम- ४८५ सिक्स 

शेन वॉटसन- ४१७ सिक्स 

ड्वॅन स्मिथ- ३७२ सिक्स