IPL 2019: हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, चेन्नईला १७१ रनचं आव्हान

हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा डाव सावरला आहे.

Updated: Apr 3, 2019, 10:06 PM IST
IPL 2019: हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, चेन्नईला १७१ रनचं आव्हान title=

मुंबई : हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा डाव सावरला आहे. या मॅचमध्ये चेन्नईला विजयासाठी १७१ रनची गरज आहे. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डने ब्राव्होच्या शेवटच्या ओव्हरला २८ रनची बरसात केली. शेवटच्या ३ ओव्हरमध्ये मुंबईने ५१ रन कुटल्या. हार्दिक पांड्याने ८ बॉलमध्ये नाबाद २५ रनची खेळी केली. यामध्ये १ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. तर पोलार्डने ७ बॉलमध्ये नाबाद १७ रन केले.

टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली. स्कोअरबोर्डवर फक्त ८ रन असतानाच क्विंटन डी कॉक ४ रनवर आऊट झाला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ४३ बॉलमध्ये सर्वाधिक ५९ रन केले. तर कृणाल पांड्याने ३२ बॉलमध्ये ४२ रन केले.

चेन्नईकडून दीपक चहर, मोहित शर्मा, इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा आणि ड्वॅन ब्राव्होला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

मुंबईची अडखळत सुरुवात

यंदाच्या मोसमात मुंबईची सुरुवात अडखळत झाली आहे. दिल्लीविरुद्धची पहिली मॅच गमावल्यानंतर मुंबईचा बंगळुरूविरुद्ध पराभव झाला. यानंतर पंजाबने मुंबईला हरवलं. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सध्या सातव्या क्रमांकावर आहे.

एकीकडे मुंबईची सुरुवात खराब झालेली असतानाच चेन्नईने मात्र त्यांच्या तीन पैकी तीन मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम सहा पॉईंट्स सह पहिल्या क्रमांकावर आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा