IPL 2019: मुंबईच्या विजयी मिरवणुकीत पुणेरी ढोल! चाहत्यांचा जल्लोष

२०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला.

Updated: May 13, 2019, 11:15 PM IST
IPL 2019: मुंबईच्या विजयी मिरवणुकीत पुणेरी ढोल! चाहत्यांचा जल्लोष title=

मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला. अत्यंत रोमहर्षक अशा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर १ रनने पराभव केला. आयपीएलच्या फायनलमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून १४९ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसनने ८० रनची खेळी करून चेन्नईला विजयाच्या जवळ नेलं, पण मलिंगाने शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरची विकेट घेऊन मुंबईला चौथी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.

मुंबईच्या विजयानंतर सोमवारी ओपन बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. या ओपन बसमध्ये मुंबईचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सहभागी झाला होता. मुंबई टीमचे मालक अंबानी यांच घर असलेल्या एंटिलियापासून ट्रायडंट हॉटेलपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. ट्रायडंट हॉटेलमध्ये खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि सेलिब्रिटींसाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मुंबईच्या या विजयी मिरवणुकीसाठी पुणेरी ढोल वाजवण्यासाठी वाद्यपथक बोलावण्यात आलं होतं. मुंबईच्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती.