चेन्नई सुपरकिंग्जने नाकारल्याने आर. अश्विन नाराज, बोलून दाखवली खंत

आयपीएल २०१८ चा लिलाव नुकताच पार पाडला. यात काही खेळाडूंना चांगली किंमत मिळाली तर काहींना खरेदीदारच सापडले नाहीत.

Updated: Feb 6, 2018, 08:36 PM IST
चेन्नई सुपरकिंग्जने नाकारल्याने आर. अश्विन नाराज, बोलून दाखवली खंत title=

नवी दिल्ली : आयपीएल २०१८ चा लिलाव नुकताच पार पाडला. यात काही खेळाडूंना चांगली किंमत मिळाली तर काहींना खरेदीदारच सापडले नाहीत. अशात काहींना आधीच्या टीमने न घेतल्याने नाराजी दिसून येत आहे. 

कुणी घेतलं विकत

टीम इंडियाचा स्पिनर रविचंद्रन अश्विन हा सध्या नाराज आहे. त्याने त्याची ही नाराजी बोलून दाखवली आहे. अश्विनवर आयपीएलच्या ११व्या सीझनच्या लिलावात ७ कोटी ७० लाखांची बोली लावण्यात आली होती. मात्र गेली अनेक वर्ष चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या अश्विनला यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतले. 

बोलून दाखवली खंत

चेन्नई सुपरकिंग्सकडून अनेक वर्ष खेळत असलेल्या अश्विनला चेन्नई टीमने नाकारले. त्यामुळे तो चांगलाच नाराज आहे. तो म्हणाला की, ‘८ वर्षांपेक्षा जास्त काळ मी चेन्नई टीमसाठी खेळलो, त्यामुळे लिलावात मला चेन्नईने डावललं या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं’.

जुन्या आठवणींना उजाळा

“चेपॉकच्या मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी आल्यावर प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या टाळ्या-शिट्ट्या या सर्व गोष्टी मला आता अनुभवता येणार नाहीत. अजुनही या गोष्टींची मला आठवण येते. मात्र यंदा पंजाबकडून खेळताना जेव्हा चेन्नईविरुद्ध मी चेपॉकच्या मैदानात उतरेन तेव्हा मी त्याच इर्ष्येने पुन्हा मैदानात उतरेन’.