मुंबईसाठी आज करो या मरो

मुंबईसाठी आजची लढत ही करो या मरो ची ठरणरा आहे. बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईला दिल्लीविरुद्धचा आजचा सामना जिंकावाच लागणार आहे

Updated: May 20, 2018, 10:54 AM IST
मुंबईसाठी आज करो या मरो title=

मुंबई : मुंबईसाठी आजची लढत ही करो या मरो ची ठरणरा आहे. बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मुंबईला दिल्लीविरुद्धचा आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. गेल्या लढतीत पंजाब विरुद्ध विजय साकारल्यानं मुंबई विजयाच्या मार्गावर जरी परतली असली ती गेल्या लढतीत दिल्लीनं मुंबईला नवमलं होतं. यामुळे या लढतीत मुंबईला नक्कीच चिंता सतावत असणार. मुंबईकडून सुर्यकुमार यादव वगळता इतर फलंदाजांना आपली छाप सोडता आलेली नाही. रोहित शर्माची कामगिरी संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंतेची बाब ठरतेय. 

दरम्यान किरॉन पोलार्ड, इविन लुईस, जसप्रीत बुमराह आणि पंड्या बंधूंवर मुंबईची भिस्त असेल. तर गेल्या लढतीत चेन्नईला पराभूत केल्यानं दिल्लीचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला असेल. श्रेयस अय्यर, रिषभ पंत, ट्रेंट बोल्ट यांच्यावर दिल्लीची भिस्त असेल. 

सामन्याची वेळ - दुपारी ४ वाजता

संघ 

दिल्ली - पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरय(कर्णधार), ऋषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, विजय शंकर, अभिषेक शर्मा, हर्षल पटेल, अमित मिश्रा, संदीप, ट्रेंट बोल्ट, आवेश खान

मुंबई - इविन लुईस, सुर्यकुमार यादव, रोहित शर्मा, इशन किशन, हार्दिक पांड्या, किरेन पोलार्ड, कृणाल पांड्या, बेन कटिंग, मिचेल मॅकग्लेन, जसप्रीत बुमराह, मयांक मार्केडे