आयपीएल ११ : मुंबई आणि राजस्थानमध्ये टक्कर..इथे पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग

प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी दोन्ही टीम चुरशीने खेळतील. कारण यातील हार त्यांना अंतिम ४ मधून बाहेर काढू शकते.

Updated: May 13, 2018, 12:48 PM IST
आयपीएल ११ : मुंबई आणि राजस्थानमध्ये टक्कर..इथे पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग title=

मुंबई : मुंबई आणि राजस्थानच्या टीममध्ये आयपीएल ११ मधील आज ४७ वी मॅच  खेळली जाणार आहे. आज रात्री ८ वाजता वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी दोन्ही टीम चुरशीने खेळतील. कारण यातील हार त्यांना अंतिम ४ मधून बाहेर काढू शकते. राजस्थानपेक्षा मुंबईची टीम सध्या मजबुत दिसत आहे. मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. त्यांनी एकुण ११ मॅचमध्ये ५ विजय आणि ६ पराजयांसोबत १० पॉईंट्स मिळविले आहेत. राजस्थानचेदेखील हेच आकडे आहेत. पण रनरेटने हा संघ मुंबई आणि कोलकाताच्या मागे पडला असून सहाव्या स्थानावर आहे. मुंबई आणि राजस्थान संघाची लाईव्ह मॅचची इंग्रजी कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडीवर दिसेल. तसेच स्पोर्ट्स १ हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी वर दिसेल. 

दिल्ली आयपीएल बाहेर 

आयपीएलच्या अकराव्या मोसमातून बाहेर होणारी दिल्ली ही पहिली टीम ठरली आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात खेळवण्यात आलेल्या मॅचमध्ये बंगळुरूनं दिल्लीचा ५ विकेटनं पराभव केला. बंगळुरूच्या या विजयाचे शिल्पकार ठरले एबी डिव्हिलियर्स आणि कर्णधार विराट कोहली. दिल्लीनं ठेवलेल्या १८२ रनचा पाठलाग करताना एबी डिव्हिलियर्सनं ३७ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली. यामध्ये ६ सिक्स आणि ४ फोरचा समावेश होता. तर विराट कोहलीनं ४० बॉलमध्ये ७० रन केले. कोहलीनं ३ सिक्स आणि ७ फोर लगावल्या. दिल्लीनं ठेवलेलं हे आव्हान बंगळुरुनं १९ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. एकीकडे दिल्लीचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरी बंगळुरू मात्र अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. पण बंगळुरुचं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणं हे इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.