INDvsSL 2nd T-20: श्रीलंकन टीमने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 22, 2017, 06:43 PM IST
INDvsSL 2nd T-20: श्रीलंकन टीमने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय title=
Image: BCCI Twitter

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

(मॅचचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा)

तीन मॅचेसच्या टी-२० सीरिजमध्ये पहिली मॅच जिंकत टीम इंडियाने १-० ने आघाडी घेतली आहे. आता इंदूरमध्ये होत असलेली मॅचही जिंकल्यास टीम इंडिया सीरिज आपल्या खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. 

बुधवारी कटकमध्ये झालेल्या मॅचमधअये टीम इंडियाने श्रीलंकेवर ९३ रन्सने शानदार विजय मिळवला होता.

टॉस जिंकल्यानंतर पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या टीमला फायदा होईल असे मध्यप्रदेश क्रिकेट संघाचे क्यूरेटर समंदर सिंह चौहान यांनी म्हटलं होतं.

त्यानंतर आता श्रीलंकन टीमने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही मॅच कोण जिंकणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.