जोहान्सबर्ग : ५ मॅचेसच्या टी-२० सीरिजमधील दोन मॅचेस जिंकलेल्या महिला टीम इंडियाला तिसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मॅचमध्ये पराभव झाला असला तरी सीरिजमध्ये टीम इंडिया अद्यापही २-१ ने आघाडीवर आहे. तिसऱ्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात फार चांगली झाली नाही.
आतापर्यंत सर्वात यशस्वी खेळाडू असलेली मिताली राज सुरुवातीलाच आऊट झाली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी टीमला सावरलं. मात्र, संपूर्ण टीम १३३ रन्सवर ऑल आऊट झाली.
दक्षिण आफ्रिकेची महिला बॉलर शबनम इस्माईलने या मॅचमध्ये ५ विकेट्स घेतले. महिला टीम इंडियाने दिलेलं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या टीमने ५ विकेट्स गमावत गाठलं आणि विजय मिळवला.
महिला टीम इंडियाकडून हरमनप्रीत कौर (४८) आणि स्मृती मंधाना (३७) रन्स केले. १२ ओव्हर्सला भारताचा स्कोअर ९३/२ असा होता. मात्र, त्यानंतर एक-एक करुन सर्वच खेळाडू माघारी परतले आणि १३३ रन्सवर टीम ऑल आऊट झाली.
दक्षिण आफ्रिकन महिला टीममधील शबनम इस्माईलने ३० रन्स देत ५ विकेट्स घेतले. भारतीय टीमला १३३ रन्सवर रोखण्यात शबनमने महत्वाची भूमिका निभावली. तर, मासाबात क्लासने २० रन्स देत दोन विकेट्स घेतले.