INDvsNZ | दुसऱ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

न्यूझीलंडने २० षटकांमध्ये  ८ बाद १५८ धावा केल्या आहेत.

Updated: Feb 8, 2019, 03:12 PM IST
INDvsNZ  | दुसऱ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय title=

ऑकलंड  : न्यूझीलंडने दिलेल्या १५९ धावांचे लक्षा गाठण्यासाठी भारतीयं संघ मैदानात उतरला आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनी उत्तम सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या १५९ धावांचे लक्षा गाठण्यासाठी भारतीयं संघ मैदानात उतरला आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनी उत्तम सुरुवात केली. या जोडीमध्ये पहिल्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्माने अवघ्या २९ बॉलमध्ये ५० धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. यात ४ सिक्स तर ३ चौकारांचा समावेश होता. रोहित शर्मा ५० धावा करुन बाद झाला. रोहित शर्माच्या पाठोपाठ शिखर धवनही ३० धावा करुन बाद झाला. 

भारताला तिसरा झटका, विजय शंकर १४ धावा करुन माघारी. लाईव्ह स्कोअर : ११८-३.

भारताला दुसरा झटका, शिखर धवन ३० धावांवर बाद.

 भारताला पहिला झटका, रोहित शर्मा ५०  धावा करुन माघारी.   

दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने २० षटकांमध्ये  ८ बाद १५८ धावा केल्या आहेत. यामुळे भारताला विजयासाठी १५९ धावांचे आव्हान आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला आलेल्या यजमानांना पहिला झटका भुवनेश्वर कुमारने दिला. त्याने  टीम सायफर्टला १२ धावांवर बाद केले. यानंतर ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी विकेट घेतले. न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि कॉलिन डि ग्रॅण्डहोम यांच्यात ५ व्या विकेटसाठी सर्वाधिक ७७ धावांची भागीदारी झाली. 

 

 

न्यूझीलंडकडून सर्वाधिक ५० धावा या  कॉलिन डि ग्रॅण्डहोमने केल्या. तर त्या पाठोपाठ अनुभवी रॉस टेलरने ४२ धावांची खेळी केली. भारताकडून सर्वाधिक ३ विकेट कृणाल पांड्याने  घेतल्या. तर खलील अहमदने २ विकेट घेतल्या. 
भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारतासाठी हा सामना करो या मरो चा आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे.     

न्यूझीलंड विरुद्धातील दुसऱ्या टी-२० सामन्याला सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (८ फेब्रुवारी) ऑकलंडमधील ईडन पार्कमध्ये खेळला जाणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून  फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान न्यूझीलंडने पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा ८० धावांनी पराभव केला. यामुळे न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

 

लाईव्ह अपडेट : न्यूझीलंडला सहावा झटका, रॉस टेलर  ४२ धावा करुन बाद   लाईव्ह स्कोर | न्यूझीलंड | १५३-६

 

 न्यूझीलंडला पाचवा झटका, कॉलिन डि ग्रॅण्डहोम ५० धावा करुन बाद  

न्यूझीलंडला चौथा झटका, केन विलियमसन २०  धावा करुन बाद.  

न्यूझीलंडला तिसरा झटका,  डॅरिल मिचेल १ धावा करुन बाद 

न्यूझीलंडला दुसरा झटका,  कुलीन मुनरो  १२ धावा करुन बाद . 

न्यूझीलंडला पहिला झटका, टीम सायफर्ट  १२  धावा करुन बाद.  

 

 

 

गेल्या अनेक मालिकांपासून भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे. पण न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे जर भारताला या टी-२० मालिकेतील आव्हान कायम ठेवायचे असेल तर, आजचा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.

पहिल्या सामान्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये भारताला विजयासाठी २२० धावांचे तगडे आव्हान दिले होते. धावांचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय संघाला केवळ १३९ धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात भारताकडून धोनीने सर्वाधिक ३९ धावा केल्या होत्या.  

 

 

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज. 

न्यूझीलंड संघ : केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्युसन, स्कॉट के, कॉलीन मुन्रो, डॅरिल मिचेल, मिचेल सॅण्टनर, टीम सायफर्ट, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स निशम