INDvsNZ : भारताला विजयासाठी २४४ धावांचे आव्हान

किवी संघाच्या चौथ्या विकेट्साठी रॉस टेलर आणि टॉम लेथन यांच्यात ११९ धावांची शतकी भागीदारी झाली. 

Updated: Jan 28, 2019, 11:42 AM IST
INDvsNZ : भारताला विजयासाठी २४४ धावांचे आव्हान   title=

माउंट मोनगानुई : न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या  तीसऱ्या एकदिवसीय सामन्याचा पहिला डाव संपला आहे. यजमान न्यूझीलंड संघाने ४९ षटकांत २४३ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी २४४ धावांची गरज आहे.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि कोलिन मुनरोच्या जोडीला या जोडीला न्यूझीलंडची धावसंख्या १० असताना भुवनेश्वर कुमारने पहिला झटका दिला. कोलिन मुनरो अवघ्या ७ धावांवर बाद झाला. यानंतर ठराविक वेळाने भारतीय गोंलदाजांनी झटके दिले.

 

किवी संघाच्या चौथ्या विकेट्साठी रॉस टेलर आणि टॉम लेथन यांच्यात ११९ धावांची शतकी भागीदारी झाली. या भागीदारीला मोडण्यास फिरकीपटू चहालला यश आले. यानंतर ठराविक वेळाने भारतीय गोंलदाजांनी झटके दिले. किवींकडून रॉस टेलरने ९३ तर टॉम लेथनने ५१ धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतले. तर हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहाल आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येक २ विकेट घेतले.

भारतीय सलामीवीरांच्या जोडीने मागील दुसऱ्या सामान्यात पहिल्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली होती. भारतीय सलामीवीरांच्या सोबततच मधली फळीने पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे हीच कामगिरी कायम ठेवत या सामन्यात भारताला विजय मिळवून मालिका विजय मिळवून देतील अशी अपेक्षा भारतीय संघाकडून असणार आहे.    
    
मालिकेच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघासाठी मह्त्वाचा आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा विजयी आकडा गाठून सामन्यासोबत मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल तर, या सामन्यात विजय मिळवून पाहुण्या भारतीय संघाच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न किवींचा असेल.