कोलकाता : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकन टीमने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कोलकातामध्ये पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून टेस्ट सीरिजला सुरवात होतेय. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर पहिली टेस्ट मॅच होत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पराभवाची धूळ चालल्यानंतर भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे.
Sri Lanka wins the toss and elects to bowl first in the 1st Test #INDvSL pic.twitter.com/fO6EQabS3A
— BCCI (@BCCI) November 16, 2017
काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या तिन्ही फॉरमॅटमध्ये श्रीलंकेचा ९-० ने धुव्वा उडवला होता. तसेच टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्मात असल्याने आपली विजयी मालिका कायम राखण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
तर, गेल्या सीरिजमधील पराभवाची भरपाई करण्यासाठी श्रीलंकन टीम सज्ज आहे.
कोलकातामध्ये बुधवारी पावसाने हजेरी लावली. तसेच, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने ३-०ने विजय मिळवल्यास गांगुलीचा रेकॉर्ड विराट मोडणार आहे. ही सीरिज ३-०ने जिंकल्यास विराट कोहली सर्वाधिक टेस्ट जिंकणारा दुसरा भारतीय कॅप्टन बनणार आहे.