अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमधून भारताला मिळालेले स्टार्स

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपला उद्यापासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात होत आहे.

Updated: Jan 12, 2018, 10:33 PM IST
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमधून भारताला मिळालेले स्टार्स title=

मुंबई : अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपला उद्यापासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात होत आहे. पृथ्वी शॉ हा भारतीय टीमचा कॅप्टन तर राहुल द्रविड टीमचा प्रशिक्षक आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू अंडर १९ वर्ल्ड कपमधूनच नावारुपाला आले आहेत.

२०१६ साली झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये रिशभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशन यांच्यासारखे खेळाडू खेळले. यातल्या पंत आणि सुंदरनं नुकतचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं.

अंडर १९ वर्ल्ड कपमधून सापडलेले हिरे

वीरेंद्र सेहवाग (१९९८)- १९९८ साली दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये सेहवाग खेळला होता. या स्पर्धेमध्ये सेहवागला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. या स्पर्धेत सेहवागनं १२.६६ च्या सरासरीनं ७६ रन्स केल्या.

हरभजन सिंग (१९९८)- सेहवागबरोबरच या स्पर्धेमध्ये हरभजन सिंगही याच वर्षी खेळला होता. या स्पर्धेत हरभजननं आठ विकेट घेतल्या होत्या.

मोहम्मद कैफ (१९९८-२०००)- मोहम्मद कैफ १९९८ आणि २००० साली झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. १९९८च्या वर्ल्ड कपमध्ये कैफनं ६२.७५ च्या सरासरीनं २५१ रन्स केल्या होत्या. २००० साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये कैफ भारतीय टीमचा कॅप्टन होता.

युवराज सिंग (२०००)- २००० साली झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये युवराज खेळला होता. या स्पर्धेत युवराजनं दोन अर्धशतकं झळकावली आणि १२ विकेट घेतल्या. अंडर १९ वर्ल्ड कप जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती. या सीरिजमध्ये युवराजला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.

शिखर धवन (२००४)- २००४ सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये शिखर धवन होता. या स्पर्धेत धवननं ८४.१६ च्या सरासरीनं ५०५ रन्स बनवल्या. यामध्ये तीन शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

सुरेश रैना (२००४)- २००४ साली शिखर धवनबरोबर सुरेश रैनाही खेळला. या स्पर्धेत रैनानं ३५.२८ च्या सरासरीनं २४७ रन्स केले होते. यात ३ अर्धशतकांचा समावेश होता.

चेतेश्वर पुजारा (२००६)- २००६ सालच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला होता. पण या स्पर्धेत चेतेश्वर पुजारानं ११६.३३ च्या सरासरीनं ३४९ रन्स बनवल्या होत्या. इंग्लंडविरुद्ध पुजारानं सर्वाधिक १२९ रन्स केल्या होत्या.

रोहित शर्मा(२००६)- पुजाराबरोबरच २००६ साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माही खेळला होता. या स्पर्धेत रोहितनं ४१ च्या सरासरीनं २०५ रन्स केल्या होत्या.

विराट कोहली(२००८)- २००८ साली झालेल्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीनं भारताचं नेतृत्व केलं होतं. विराटच्या नेतृत्वामध्ये भारतानं ही स्पर्धा जिंकली होती. कोहलीनं ४७च्या सरासरीनं २३५ रन्स केल्या होत्या.

रविंद्र जडेजा(२००६-२००८)- रविंद्र जडेजानं २००६ आणि २००८ सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये जडेजानं १३.५७ च्या सरासरीनं १४ विकेट घेतल्या होत्या.