Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बृजभूषण यांच्यावर पॉस्कोसह इतर कलम लावण्यात आली आहेत. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने बृजभूषण यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. दरम्यान जोपर्यंत बृजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत.
सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना बृजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. कुस्तीपटूंच्यावतीने वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सीलबंद लिफाफा दिला आणि कुस्तीपटूंच्या सुरक्षेची मागणी केली. तसेच विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचे आवाहन केले.दरम्यान, त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर 7 महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार करणे, 2021 मध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप दरम्यान रेल्वे प्रशिक्षकाला मारहाण करणे आणि निलंबित करणे आणि कुस्तीपटूला थप्पड मारणे यासारखे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
बृजभूषण सिंह कुस्तीपटूंनी लैंगिक छळाच्या आरोपानंतर आपल्या पदाचा राजीनामा WFI च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही. त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे अनेक आरोप झाल्यानंतर वादळ निर्माण झाले असताना त्यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात हा विषय असताना मला यावर भाष्य करण्याची गरज का आहे? भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल रोजी दिल्ली सरकार आणि पोलिसांना नोटीस बजावली होती. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर गुन्हा दाखल झाला
आपण आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सर्व शक्तीनिशी लढा देऊ. त्यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटलेय, आपल्यावरील आरोपांचा उल्लेख न करता, जोपर्यंत लढण्याची ताकद येत नाही तोपर्यंत आपण पराभव स्वीकारणार नाही, असे सूचित केले. दरम्यान, आमचे आंदोलन सुरुच राहणार आहे. जोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल, असे सांगत कुस्तीपटू आंदोलनावर ठाम आहेत. तुरुंगात पाठवले जात नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Wrestlers' petition seeking registration of FIR against WFI president Brij Bhushan | "...Our protest will continue until he is sent to jail," says wrestler Bajrang Punia.
SG Tushar Mehta today apprised Supreme Court that the Delhi Police will register FIR by today… https://t.co/h8yp5wS5Xh pic.twitter.com/u2kMC593Ri
— ANI (@ANI) April 28, 2023
जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट, ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह स्टार कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आता गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत बृजभूषण यांना अटक होत नाही तोपर्यंत कुस्तीपटू आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत, असे ते आंदोलनकर्ते म्हणाले.