ISSF World Cup मध्ये मराठमोळ्या राही सरनोबतची सुवर्ण कमाई

राही सरनोबतने (Rahi Sarnobat) सुवर्णकमाई केली आहे.  

Updated: Jun 28, 2021, 04:38 PM IST
ISSF World Cup मध्ये मराठमोळ्या राही सरनोबतची सुवर्ण कमाई  title=

मुंबई : क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात (Shooting World Cup)  भारतीय नेमबाज राही सरनोबतने (Indian shooter Rahi Sarnobat) 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी विश्वचषकातील भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. अंतिम फेरीत राहीने 40 पैकी 39 गुण मिळवत सुवर्णपदक मिळवलं. अंतिम फेरीत राहीने फ्रेंच आणि रशियन नेमबाजांना मागे टाकत सुवर्ण पदक पटकावलं. याशिवाय अंतिम फेरीत मनु भाकरला काही खास कामगिरी करता आली नाही. मनुला 7 व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. ( Indian shooter Rahi Sarnobat wins gold medal in the women's 25M Pistol event at the ISSF World Cup in Osijek)

 
नेमबाजी विश्व चषकातील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र (ISSF World Cup) टीम स्पर्धेत सौरभ चौधरी (Saurabh Chaudhary) आणि मनु भाकर (Manu Bhaker) या भारतीय जोडीने रौप्य पदक (Manu Bhaker) जिंकण्याची कामगिरी केली होती. 
 
राहीने 591 गुणांसह दुसर्‍या स्थानावर क्वालीफाई केल्यानंतर 39 स्कोअर केला. अंतिम फेरीत तिने उल्लेखनीय कामगिरी केली. राहीने तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेत उत्तमरित्या गुणांची कमाई करत सुवर्ण पदक पटकावलं. फ्रान्सचा मॅथिलडे लॅमौले रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी झाला. त्याने अंतिम सामन्यात 31 गुणांची कमाई केली. 
 
दरम्यान, यापूर्वी भारताने 1 रौप्य आणि 2 कांस्यपदक जिंकले आहेत. राहीने मिळवलेले सुवर्णपदक हे विश्वचषकातील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. राहीने सुवर्ण कमाई केल्याने सोशल मीडियावरही तिचं कौतुक केलं जात आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी भारतीय नेमबाजांसाठी ही अखेरची स्पर्धा आहे. भारतीयांना टोकियो ऑलिम्पिकमध्येही नेमबाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.