आयपीएल लिलावात राहुलच्या 'या' शिष्यावर नोटांची बरसात....

आयपीएल लिलावात (IPL Auction 2018) युवा विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसनवर नोटांची बरसात झाली असे म्हणायला काही हरकत नाही. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 27, 2018, 07:40 PM IST
आयपीएल लिलावात राहुलच्या 'या' शिष्यावर नोटांची बरसात.... title=

नवी दिल्ली : आयपीएल लिलावात (IPL Auction 2018) युवा विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसनवर नोटांची बरसात झाली असे म्हणायला काही हरकत नाही. राजस्थान रॉयल्सने ८ कोटींची बोली लावत संजू सॅमसनला आपल्या टीममध्ये घेतले.

 भविष्यातील महेंद्र सिंग धोनी

२३ वर्षीय तरुण किक्रेटरचे कौशल्य पाहुन तज्ञांनी त्याला भविष्यातील महेंद्र सिंग धोनी म्हटले आहे. मात्र तज्ञांचे मत खरे करणे हे सॅमसनच्या परफॉर्मेंसवर अवलंबून आहे. संजू सॅमसन आतापर्यंत IPL मध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेयरडेविल्सतर्फे खेळला आहे.

द्रविडच्या टीप्स आणि कोचिंग

क्रिकेटमधून संन्सास घेतल्यानंतर राहुल द्रविडने तरुण क्रिकेटर्सना ट्रेनिंग देण्यास सुरूवात केली. याच दरम्यान त्याने संजू सॅंमसन या वर्ल्ड क्लास फलंदाजाला तयार केले. द्रविडच्या टीप्स आणि त्याचे कोचिंग इतके जबरदस्त आहे की त्यामुळे IPL 2017 मध्ये संजूने आपले पहिले शतक झळकवले. 

संजूची कामगिरी

संजू सॅमसनने ६६ IPL मॅचेसमध्ये २५ च्या अॅव्हरेजने १४२६ रन्स केले. यात  एक शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. याचा स्ट्राईक रेट १२४ आहे. त्याची विकेटकीपिंग जबरदस्त असून त्याने आतापर्यंत ३४ कॅच घेतल्या आहेत आणि ३ खेळाडूंना क्लिन बोल्ड केले आहे.

Sanju samson

राहुल द्रविडची  जबरदस्त साथ 

संजूच्या वाईट कामगिरीतही राहुल द्रविडने कोच म्हणून त्याला जबरदस्त साथ दिली. संजू सॅमसनने गेल्या आयपीएलमध्ये दिल्लीसाठी फक्त २९१ रन्स केले होते. तेव्हापासून ते एक वेळ अशी आली की आयपीएलमध्ये सर्व मॅच खेळणाऱ्या पहिल्या तीन खेळाडूंमध्ये त्याचे नाव होते. हे सर्व राहुल द्रविडमुळेच होऊ शकले.

या खेळाडूंमध्ये संजू?

काही दिवसांपूर्वीच राहुलने सांगितले की, माझ्याजवळ असे काही खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही फॉर्मेटमध्ये खेळू शकेल. यात नक्कीच संजूचे नाव असेल. राहुल शिवाय अजून एका माजी क्रिकेटपटूने संजूला पारखले आहे. तो म्हणजे विकेटकीपर किरण मोरे. संजूने किरण मोरे यांच्यासोबत राष्ट्रीय विकेटकीपिंग कॅंपमध्ये सहभाग घेतला होता.