Dipa Karmakar : डोपिंग टेस्टमुळे जिम्नॅस्ट दीपा कर्माकर अडचणीत; ITA ने घातली 21 महिन्यांची बंदी

 दीपाच्या चाचणीचे नमुने 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्पर्धेबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या चाचणीत दीपा चाचणीत दोषी आढळल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 10 जुलै 2023 पर्यंत कायम राहील

Updated: Feb 4, 2023, 11:16 AM IST
Dipa Karmakar : डोपिंग टेस्टमुळे जिम्नॅस्ट दीपा कर्माकर अडचणीत; ITA ने घातली 21 महिन्यांची बंदी  title=

Dipa Karmakar : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे चर्चेत आली आहे. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) दीपावर बंदी घातली आहे. भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर आयटीएने हायजेनामाइन (Higenamine) प्रतिबंधित पदार्थाची चाचणी (dope test) पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला अपात्र ठरवत 21 महिन्यांची बंदी घातली आहे. दीपाच्या चाचणीचे नमुने 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्पर्धेबाहेर काढण्यात आले आणि ही बंदी 10 जुलै 2023 पर्यंत कायम राहील.

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपा ही पहिली जिम्नॅस्ट होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपाने चौथे स्थान पटकावले होते. यानंतर ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली आणि पदक न जिंकता स्टार बनली. याआधी कर्माकरने 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी दीपा पहिली महिला जिम्नॅस्ट होती.

त्यानंतर आता आयटीएने दीपा कर्माकरला 21 महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. 10 जुलै 2023 पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. FIG अँटी-डोपिंग नियमांच्या कलम 10.8.2 नुसार असलेल्या कराराद्वारे या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

दीपाच्या चाचणीत कोणते औषध सापडले?

दीपा कर्माकर हिजेमिन एस-3 बीटा-2 घेतल्याबद्दल दोषी आढळली आहे. इंटरनॅशनल डोपिंग एजन्सीने Hygemin S-3 Beta-2 ला प्रतिबंधित औषधांच्या श्रेणीत ठेवले आहे. या औषधांचे सेवन केल्याबद्दल दोषी आढळलेल्या कोणत्याही खेळाडूवर बंदी घातली जाऊ शकते.

हायजेनामाइन म्हणजे काय?

युनायटेड स्टेट्स अँटी-डोपिंग एजन्सी (यूएसएडीए) नुसार, हायजेनामाइनमध्ये मिश्रित अॅड्रेनर्जिक रिसेप्टर आहे.  ते सामान्य उत्तेजक म्हणून काम करू शकते. 2017 मध्ये WADA च्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. हायजेनामाइन वापर कमी प्रमाणात दम लागण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा वापर कार्डियक आउटपुट वाढवण्यासाठी हृदयाची स्थिती मजबूत करण्यासाठी केला जाऊ जातो.