भारत-पाकिस्तान सामन्याच्या बाजुने नाही भारत सरकार

भारत आणि पाकिस्तान यांच्यतील सामना हा खेळापेक्षाही वेगळा असतो. दोघांमध्ये सामना व्हावा म्हणून अनेकांनी वक्तव्य केली आहेत. पण याचा अंतिम निर्णय सरकारच्या आहात आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 23, 2017, 04:44 PM IST
भारत-पाकिस्तान सामन्याच्या बाजुने नाही भारत सरकार title=

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यतील सामना हा खेळापेक्षाही वेगळा असतो. दोघांमध्ये सामना व्हावा म्हणून अनेकांनी वक्तव्य केली आहेत. पण याचा अंतिम निर्णय सरकारच्या आहात आहे.

भारत सरकार भारत-पाकिस्तान सामन्याच्या बाजुने नाही आहे. याबाबत अजून अंतिम निर्णय घेतला गेलेला नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही देशांमध्ये सामना होण्याची शक्यता कमीच असल्याचं बोललं जातंय. 

आयसीसी चॅम्पियनशिपनसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका खेळली जावी म्हणून बीसीसीआयने क्रीडा मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांची भेट घेतली होती.

बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'ही एक शिष्टाचार भेट होती. ती खूप आधीच ठरली होती. राठोड यांनी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी भेटण्याती इच्छा होती. पाकिस्तानसोबत खेळण्याचा निर्णय हा क्रीडा मंत्रालयाचा नसून तो गृहमंत्रालय आणि पीएमओचा आहे असं देखील राठोड यांनी म्हटलं.

बीसीसीआयने 2014 मध्ये पीसीबीसोबत सामंजस्य करार केला होता. ज्या अंतर्गत त्यांना 2015 आणि 2023 दरम्यान सहा द्विपक्षीय मालिका खेळण्याची गरज आहे. भारताने संबंध बिघडल्याने पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला. 2012-13 मध्ये दोन ट्वेंटी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळल्यानंतर भारताने पाकिस्तानशी एकही मालिका खेळलेली नाही.