मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत आज चौथा सामना आज (17 जून) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले, तर तिसरा सामना भारताने जिंकला. आता चौथ्या सामन्यात भारत विजय मिळवून बरोबरी साधत तो की दक्षिण आफ्रिका मालिका खिशात घालते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गेल्या तीन सामन्यात बोलायचं गेलं तर सुरुवातीचे दोन सामने सोडून भारताचे गोलंदाज खास अशी कामगिरी करू शकले नाही आहेत. आवेश खानने तर तीनही सामन्यात एकही विकेट काढला नाही आहे. भूवनेश्वर आणि चहलला सोडून इतर गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक आहे. त्यामुळे आवेशचा इन फॉर्म पाहता त्याच्याजागी दुसऱ्या गोलंदाजाला संधी देता येऊ शकते.
उमरान मलिकचा पर्याय
संपुर्ण क्रिकेट विश्व ज्या खेळाडूच्या पदार्पणाची वाट पाहत आहे त्या उमरानला अद्याप संधी मिळाली नाहीय. चौथ्या सामन्यात आवेश खानच्या जागी त्याला संधी देण्याची शक्यता आहे. उमरानने राजकोटमध्ये पदार्पण केल्यास भारतीय गोलंदाजांची ताकद वाढणार आहे. तसेच, उमरानविरुद्ध फलंदाजीचा तेवढा अनुभव आफ्रिकन फलंदाजांना नाही. त्यामुळे भारताला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.
आयपीएल कामगिरी
उमरानने आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या. यादरम्यान उमरान मलिकची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २५ धावांत पाच बळी. IPL 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत उमरान चौथ्या क्रमांकावर राहिला.
भारतीय संघातील गोलंदाजीची कमकुवत बाजू पाहता उमरानला संघात संधी देण गरजेचे आहे. आता कर्णधार रीषभ पंत याबाबत काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.