PHOTO : ओ साथी चल..., 'विरुष्का' पुन्हा देत आहेत #CoupleGoals

Mine हे इतकंच लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.

Updated: Feb 5, 2019, 01:26 PM IST
PHOTO : ओ साथी चल..., 'विरुष्का' पुन्हा देत आहेत #CoupleGoals  title=

मुंबई :  #CoupleGoals हा असा हॅशटॅग काही दिवसांपासून सोशल मीडियावर बराच वापरात आहे. कोणा एका सेलिब्रिटी जोडीचा किंवा एखाद्या सुरेख जोडप्याचा फोटो जो अनेकांचं लक्ष वेधून जातो, अशा फोटोंसोबत हा हॅशटॅग जोडला जातो. जोडी आणि जोडीदार नेमके कसे असावेच याचं प्रमाण देणाऱे असंख्य फोटो, असंख्य जोड्या सोशल मीडियावर चर्चेत असतात. या जोड्यांमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांचाही समावेश होतो. 

क्रिकेट आणि कलाविश्वाला जोडणारी ही जोडी त्यांच्या नात्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून प्रकाशझोतात होती. त्यातही सोशल मीडियावर व्हायरल होणारे आणि अनुष्का, विराटकडून पोस्ट करण्यात येणारे फोटो पाहता खऱ्या अर्थाने ते दोघंही सर्वांनाच #CoupleGoals देतात असं म्हणायला हरकत नाही. विरुष्काचा विषय असा  एकाएकी निघण्यामागे कारणही तसंच आहे. 

इन्स्टाग्रामवर विराटने त्याच्या पत्नीसोबतचा म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आणि अनुष्का पाठमोरे एका सुरेख असा वाटेवर चालत असताना दिसत आहेत. अनुष्काच हळूच कॅमराकडे पाहून हसणं या फोटोला आणखी सुरेख करत आहे. एकमेकांच्या करिअरमध्ये पावलोपवली साथ देणाऱ्या विरुष्काने व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत काही खास क्षणांचा मनमुराद आनंद लुटण्यालाच प्राधान्य दिलं हेच हा फोटो पाहताना लक्षात येत आहे. 

 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

Mine हे इतकंच लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच अनुष्काच्या इन्स्टाग्राम हँडलचाही त्याने उल्लेख केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का आणि विराटने सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो पाहता ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस नेमकी का उतरते याचा अंदाज येत आहे.