सचिन म्हणतो, ताडोबा अभयारण्यात 'मी पुन्हा येईन'...

पाहा तो म्हणतोय तरी काय... 

Updated: Feb 4, 2020, 11:23 AM IST
सचिन म्हणतो, ताडोबा अभयारण्यात 'मी पुन्हा येईन'...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई: मी पुन्हा येईन, हे वाक्य गेल्या काही दिवसांपासून बरंच चर्चेत राहिलं आहे. राजकीय वर्तुळामध्ये तर, या एका वक्तव्याने कित्येक चर्चांना वाव दिला. आताही चर्चा होतेय ती 'मी पुन्हा येईन'चीच.... पण, यावेळी निमित्त मात्र वेगळं आहे. हे निमित्त आहे ते म्हणजे मास्टर ब्लास्टर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या जंगल सफारीचं. 

काही दिवसांपूर्वीच सचिन ताडोबा येथे दाखल झाला. आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढत मास्तर ब्लास्टर तेथे आल्यामुळे त्याला पाहण्यासाठीही अनेकंनीच गर्दी केली, याच गर्दीतून वाट काढत सचिनही जंगलाच्या या वाटांवर निघाला वाघोबांची एक झलक टीपण्यासाठी. 

क्रिकेटच्या मैदानातला वाघ खऱ्याखुऱ्या जंगलातील वाघाला पाहण्यासाठी आला आणि त्याची ही इच्छा पूर्णही झाली बरं. खुद्द सचिननेच त्याच्या ताडोबा सफरीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्याला एका वाघिणीसह तिचे ४ बछडे दिसल्याचंही सांगितलं आहे. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

मुख्य म्हणजे आपल्या या सफारीमध्ये जंगलावर राज्य करणाऱ्या वाघिणीला पाहण्याचं श्रेय त्याने ताडोबा व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकालाच दिलं आहे. '' मला ताडोबा अभयारण्यात अविस्मरणीय अनुभव आला. आम्हाला वाघिण आणि चार बछडे पाहायला मिळाले. ते जवळपास ४५ मिनिटं आमच्या समोर खेळत होते. अशा प्रकारचे अनुभव फार कमी मिळतात. ही गोष्ट शक्य होते ती या अभयारण्याचे संरक्षण आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे'' असं म्हणत त्याने व्हिडिओ पोस्ट केला आहे. शिवाय या अभयारण्यात पुन्हा येण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. तेव्हा आता मी पुन्हा येईन, असं म्हणणारा हा मास्टर ब्लास्टर पुन्हा केव्हा या सफारीसाठी येतो, याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल.