आता म्हणे माही शेती करणार; त्यावर आनंद महिंद्रा म्हणतात...

पाहा नेमकं असं काय सुरु आहे.... 

Updated: Jun 11, 2020, 05:57 PM IST
आता म्हणे माही शेती करणार; त्यावर आनंद महिंद्रा म्हणतात...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजीबासून ते यष्टीरक्षणापर्यंतच्या क्षेत्रांमध्ये अफलातून कामगिरी करणारा क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी या खऱ्या आयुष्यातही अशीच कामगिरी करताना दिसतो. एक खेळाडू, मुलगा, वडील, पती अशा विविध भूमिका तो लिलया पेलत आहे. आता त्यातच आणखी एका भूमिकेची भर पडत असल्याचं स्पष्ट होत आहे. ही भूमिका आहे शेतकऱ्याची. 

क्रिकेट, कुटुंब या गोष्टींसोबतच धोनीचं आणखी एका गोष्टीवर कमालीचं प्रेम आहे. ते म्हणजे त्याचे प्राणी आणि अर्थाच त्याच्याकडे असणाऱ्या बहुविध वाहनांचा संग्रह. या संग्रहामध्ये आता आणखी एका नव्या आणि तितक्याच उपयुक्त अशा वाहनाची भर पडली आहे. रांची येथील आपल्या फार्महाऊस परिसरात सेंद्रीय शेती करण्यासाठी म्हणून धोनीने चक्क एक ट्रॅक्टर खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. 

Mahindra Swaraj 963 FE ची खरेदी करणाऱ्या धोनीचा एक व्हिडिओ चेन्नई क्रिकेट संघाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्याची दखल खुद्द महिंद्रा ऍण्ड महिंद्रा उद्योग समुहाच्या आनंद महिंद्रा यांनीही घेतली आहे. 

 

धोनीच्या या निवडीला दाद देत महिंद्रा यांनीही अगदी उस्त्फूर्त प्रतिक्रिया दिली. धोनीच्या निर्णयक्षमतेची त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून प्रशंसा केली. एकिकडे महिंद्रा यांना भावलेली माहिती निर्णयक्षमता आणि दुसरीकडे शेतीकडे वळलेला माही पाहता आता यात पुढे माही नेमकं काय करणार याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल.