पाहा बालपणीच्या आठवणीत कसा रमतोय सचिन तेंडुलकर

यावेळी त्याचा साथ मिळाली, एका फेव्हरेट व्यक्तीची...   

Updated: Jul 16, 2020, 02:54 PM IST
पाहा बालपणीच्या आठवणीत कसा रमतोय सचिन तेंडुलकर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : क्रिकेटच्या विश्वाला रामराम ठोकणारा Sachin Tendulkar सचिन तेंडुलकर यानं कायमच क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. अगदी मैदानावर आणि मैदानाबाहेरही कायमच त्याचा अफलातून अंदाज पाहायला मिळाला आहे. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा मास्टर ब्लास्टरही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. 

पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द सचिनही त्याला अपवाद नाही. सचिननं सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या लहान मुलाप्रमाणे सचिन पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत आहे. 

पावसाच्या सरी बरसत असताना ज्याप्रमाणे अतिशय कुतूहलानं एखादं लहान मुल त्याचा प्रत्येक थेंब आपल्या अंगावर झेलतं त्याचप्रमाणे सचिनही पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या अंगावर झेलत त्याच पावसाच्या साचलेल्या पाण्यातही कुतूहलानं खेळताना आणि निसर्गाच्या या किमयेला पाहताना दिसत आहे. 

सचिनला या क्षणी त्याच्या जीवनातील अतिशय फेव्हरेट अशा व्यक्तिची साथ मिळाली आहे. बरं ही खास व्यक्ती यावेळी सचिनच्या कॅमेरावुमनच्या रुपात तिची भूमिका बजावताना दिसली. सचिननेच याबाबत त्याच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

 

क्रिकेट विश्वात रमणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या जीवनातील या क्षणांना पाहून सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्सनीही त्यांच्या पावसाळ्यातील आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.