दारुण पराभवानंतर भारतीय संघानं केलं असं काही...

धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेनं भारताचा दारुण पराभव केला

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 11, 2017, 06:03 PM IST
दारुण पराभवानंतर भारतीय संघानं केलं असं काही...  title=

धर्मशाला : धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेनं भारताचा दारुण पराभव केला. एकतर्फी झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटनं विजय झाला. या विजयाबरोबरच श्रीलंकेनं ३ वनडेच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या या पराभवानंतर भारतीय संघानं शेकोटी करून मौज मस्ती केली. धर्मशालामध्ये झालेल्या मॅचमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यर यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

जय-पराजय होत असतात. पण आम्ही टीमसारखे एकत्र आहोत, असं कॅप्शन श्रेयस अय्यरनं या फोटोला दिलं आहे. धर्मशालामध्ये सध्याचं तापमान १० अंश आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी भारतीय संघातल्या खेळाडूंनी शेकोटी लावली. या फोटोमध्ये अक्षर पटेल, महेंद्रसिंग धोनी, युझुवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि शिखर धवन दिसत आहेत.

 

Win or lose...we stay as a team!#bornfire

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

 

या मॅचमध्ये श्रीलंकेच्या सुरुंगा लकमलनं ४ विकेट घेत भारतीय बॅटिंगला खिंडार पाडलं. टॉस जिंकून श्रीलंकेनं भारताला बॅटिंगला बोलवलं आणि ११२ रन्सवरच भारतीय संघ ऑल आऊट झाला. मग श्रीलंकेनं २०.४ ओव्हरमध्ये तीन विकेट गमावून हे आव्हान पार केलं.

श्रीलंकेच्या उपुल थरंगानं सर्वाधिक ४९ रन्स आणि मॅथ्यूजनं २५ आणि निरोशन डिकवेलानं २६ रन्स बवले. भारताकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताची एकवेळ अवस्था २९ रन्सवर ७ विकेट अशी झाली होती. पण धोनीनं ६५ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी करून भारताला वनडे क्रिकेटमधल्या सगळ्यात कमी स्कोअरवर ऑल आऊट होण्यापासून वाचवलं.