पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत भारताने जिंकला वर्ल्ड कप

भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत दृष्टीहिनांचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 20, 2018, 07:04 PM IST
पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत भारताने जिंकला वर्ल्ड कप title=
Photo Credit: Twitter @blind_cricket

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत दृष्टीहिनांचा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे.

शारजा स्टेडिअमध्ये झालेल्या या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानचा दोन विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबतच भारताने सलग दुसऱ्यांदा हा वर्ल्डकप जिंकला आहे. 

प्रथम बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तानच्या टीमने ३८ ओव्हर्समध्ये ३०९ रन्सपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय टीमने अवघ्या ३८ ओव्हर्समध्येच पाकिस्तानवर विजय मिळवला.

भारतीय टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून व्यंकटेशने ३५ रन्स प्रकाशने ४४ रन्सची इनिंग खेळली.

२०१४ साली झालेल्या दृष्टीहिनांच्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्येही भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. ७ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता.