कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारताचा ६ विकेट्सनं विजय झाला आहे. श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 हरल्यानंतर या ट्रायसीरिजमध्ये भारतानं पुन्हा एकदा शानदार कमबॅक केलं आहे.
बांग्लादेशनं ठेवलेलं १४० रन्सचं आव्हान भारतानं १८.४ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. १४० रन्सचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा आणि रिशभ पंतच्या रुपात दोन धक्के बसले पण शिखर धवननं भारताची इनिंग सावरली. धवननं ४३ बॉल्समध्ये ५५ रन्स केले. तर सुरेश रैनानं २७ बॉल्समध्ये २८ रन्स आणि मनिष पांडेनं १९ बॉल्समध्ये नाबाद २७ रन्स केले. बांग्लादेशच्या रुबेल हुसेनला सर्वाधिक २ विकेट मिळाल्या. तस्कीन अहमद आणि मुस्तफिजुरला प्रत्येकी १ विकेट मिळाली.
टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय बॉलर्सनी बांग्लादेशला २० ओव्हर्समध्ये १३९ रन्सवर रोखलं. जयदेव उनाडकटनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर विजय शंकरला २ विकेट मिळाल्या. शार्दूल ठाकूर आणि युझवेंद्र चहलनं प्रत्येकी एक विकेट घेतली. बांग्लादेशच्या लिटोन दासनं सर्वाधिक ३४ रन्स केल्या तर सब्बीर रहमानला ३० रन्स करता आल्या.