...तर टेस्ट बरोबरच वनडेमध्येही भारत नंबर १ होईल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारत २-१नं हरला आहे.

Updated: Jan 29, 2018, 09:35 PM IST
...तर टेस्ट बरोबरच वनडेमध्येही भारत नंबर १ होईल title=

दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारत २-१नं हरला आहे. सीरिज गमावल्यानंतरही भारत टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. टेस्ट प्रमाणेच वनडेमध्येही पहिल्या क्रमांकावर जायची संधी भारताला आहे.

१ फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला सुरुवात होत आहे. या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेला ४-२नं हरवलं तर भारत आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल. तर सीरिज ड्रॉ झाली तरी दक्षिण आफ्रिका वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम राहील.

या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ५-१नं विजय झाला तर भारत तिसऱ्या क्रमांकावर जाईल. सध्या १२१ पॉईंट्ससह दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर, ११९ अंकांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर तर ११६ अंकांसह इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडनं ४-१नं पराभव केल्यामुळे वनडे क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

कोहली-इमरान ताहीर पहिल्या क्रमांकावर

आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर, एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या क्रमांकावर, डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या, रोहित शर्मा चौथ्या आणि बाबर आझम पाचव्या क्रमांकावर आहे. बॉलर्सच्या यादीमध्ये इमरान ताहीर पहिल्या, ट्रेंट बोल्ट दुसऱ्या आणि जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे.