पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताची बॅटिंग, रोहित-अश्विनला संधी नाही

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकला आहे. 

Updated: Aug 22, 2019, 07:46 PM IST
पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताची बॅटिंग, रोहित-अश्विनला संधी नाही title=

एंटिगा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने टॉस जिंकला आहे. कर्णधार विराट कोहलीने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. २ टेस्ट मॅचच्या या सीरिजसोबतच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या टेस्टमध्ये टीम इंडियाने काही आश्चर्यकारक बदल केले आहेत. फॉर्ममध्ये असलेल्या रोहितला टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. तर अश्विनलाही संधी देण्यात आलेली नाही.

सहा बॅट्समन, एक विकेट कीपर आणि चार बॉलरना घेऊन टीम इंडिया मैदानात उतरली आहे. भारतीय टीममध्ये रोहित शर्माऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. हनुमा विहारी हा बॅटिंगसोबत उपयुक्त ऑफ स्पिन बॉलिंगही करतो. त्यामुळे अश्विन आणि रोहितऐवजी विहारीला संधी दिल्याचं बोललं जात आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ७१ वर्षात ९६ टेस्ट मॅच झाल्या. यातल्या वेस्ट इंडिजने ३० मॅच आणि भारताने २० मॅच जिंकल्या. उरलेल्या ४६ मॅच ड्रॉ झाल्या. पण मागच्या १७ वर्षांमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही टेस्ट मॅच गमावली नाही. मागच्या १७ वर्षात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये २३ मॅच खेळवण्यात आल्या. यातल्या १२ भारताने जिंकल्या तर ११ मॅच ड्रॉ झाल्या.

भारतीय टीम

मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

वेस्ट इंडिज टीम 

क्रेग ब्रॅथवेट, जॉन कॅम्पबेल, शाय होप, शामराह ब्रुक्स, डॅरेन ब्राव्हो, शिमरन हेटमायर, रोस्टन चेस, जेसन होल्डर, मिगुएल कमिन्स, शेनन गॅब्रियल, केमार रोच