कोलंबो : तिरंगी टी20 सीरीज टूर्नामेंटच्या तिसऱ्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे.
तिसऱ्या सामन्यामध्ये पावसाच्या व्यत्ययाने टॉसला उशिर होत आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरु होणार आहे.
भारत आणि श्रीलंकेमधला या सिरीजमधला हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताचा ५ विकेटने पराभव झाला होता. हा सामना जिंकत भारत या सिरीजमध्ये आपलं संघर्ष कायम ठेवू शकतो.
श्रीलंकेने भारताविरोधात पहिल्या सामन्यात ६ ओव्हरमध्ये ७५ रन केले होते तर बांगलादेशसोबतच्या दुसऱ्या सामन्यामध्ये ७० रन केले होते. भारताने मात्र पहिल्या ६ ओव्हरमध्ये श्रीलंकेविरुद्ध ४० तर बांगलादेश विरोधात ४७ रन केले होते. त्यामुळे पहिल्या ६ ओव्हरमध्ये भारतीय टीम आणि ओपनर्स कमी पडतांना दिसत आहे.