IND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, 'या' खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री

टीम इंडियाच्या नव्या वर्षाच्या पहिल्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होतेय, भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे

Updated: Jan 3, 2023, 06:12 PM IST
IND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, 'या' खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री title=

IND vs SL ODI Series:भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या टी20 मालिकेला (T20 Series) आजपासून सुरुवात होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Mumbai Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्या आधीच बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवड समितीने (Indian Selection Committee) घातक गोलंदाजाची टीम इंडियात (Team India) निवड केली आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात हा गोलंदाज खेळणार आहे. दुखापतीच्या (injury) कारणामुळे हा खेळाडू गेले काही महिने टीम इंडियापासून दूर होता.

घातक गोलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री
भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) संघात पुनरागमन केलं आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहला संघात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. बीसीसीआयने एक ट्विट करत ही माहिती दिली आहे. भारत आणि श्रीलंकादरम्यान टी20 मालिकेनंतर 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 

दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह टीमबाहेर
दुखापतीच्या कारणामुळे जसप्रीत बुमराह गेले अनेक महिने टीम इंडियापासून दूर होता. एशिया कप 2022 (Asia Cup 2022) आणि टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) सारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही बुमराह खेळा शकला नव्हता. या स्पर्धांमध्ये बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियाला विशेष जाणवली. बुमराह टीम इंडियासाठी आपला शेवटचा सामना सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू आहे, क्रिकेटच्य तीनही फॉर्मेटमध्ये त्याने टीम इंडिया अनेक सामने जिंकून दिले आहेत. बुमराह भारतासाठी 30 कसोटी सामने खेळला असून यात त्याने 128 विकेट घेतल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्या त्याच्या खात्यात 121 विकेट जमा आहेत. याशिवाय 60 टी20 सामन्यात 70 विकेट त्याने मिळवलेत.

हे ही वाचा : TMKOC: 'तारक मेहता...'ला आणखी एक धक्का, 14 वर्षांनंतर 'या' बड्या व्यक्तीने सोडला शो

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह.