जोहान्सबर्ग : विजयाचा सिलसिला कायम ठेवत भारतीय टीम आज दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात चौथ्या वनडेत विजय मिळवत पुन्हा एकदा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल.
सीरीजमध्ये 3-0 ने पुढे असलेली भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर पहिली वनडे सीरीज जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. याआधी 2010-11 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात 2-1 ने पुढे असतांना देखील नंतर भारताचा 3-2 ने पराभव झाला होता.
भारताने न्यूलँड्समध्ये विजयानंतर 1992-93 मध्ये दक्षिण आफ्रिकेत द्विपक्षीय वनडे सीरीजमध्ये पहिल्यांदा ३ सामने जिंकले होते. आता भारताने आजचा सामना जिंकला तर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर आपलं वर्चस्व कायम ठेवू शकतो.
तिसऱ्या वनडेआधी शिखर धवनने म्हटलं होतं की, टीमला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. टीममध्ये आत्मसमाधानाची भावना अजिबात नाही आहे. विराट कोहलीने 34वं वनडे शतक ठोकत भारताला विजय मिळवून दिला. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी मिळून 30 पैकी 21 विकेट आपल्या नावावर केले आहेत.