जोहान्सबर्ग : द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात संथ झाली. मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी डावाची सुरुवात केली.
दिवसातील पहिला झटका व्हर्नॉन फिलेंडरने राहुलच्या रुपाने दिला. राहुल 16 धावा करुन बाद झाला. तेव्हा टीम इंडियाचा स्कोर दोन बाद 51 होता.
त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहेत. याआधी दुसऱ्या दिवशी टीम इंडिया आणि आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी बुमराह आणि भुवनेश्वरच्या घातक गोलंदाजीमुळे आफ्रिकेला 200हून कमी धावांवर रोखता आले.
बुमराहने पाच तर भुवनेश्वरने तीन विकेट घेतल्या. यामुळे आफ्रिकेचा पहिला डाव 194वर संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एक विकेट गमावताना 49 धावा केल्या होत्या.