मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये क्रिकेटच्या मैदानातले कट्टर प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान आज आपआपसात भीडणार आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आजचा सामना हा पर्वणी असणार आहे. हा सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाने पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध हरला होता. त्य़ानंतर आता सर्वांच्या नजरा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याकडे लागल्या आहेत. रविवारी दुपारी 3.30 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 सामना होणार आहे.
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर होणाऱ्या या सामन्यात सर्वांच्या नजरा स्मृती मानधना यांच्यावर असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिला चांगली सुरुवात झाली, पण तिला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तसेच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया येथे जबरदस्त विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सामना कुठे पाहता येणार?
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर भारत-पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना सोनी लिववर पाहता येणार आहे.
दोन्ही संघ
टीम इंडिया : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कॅ), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका सिंग, स्नेह राणा, एस. मेघना, पूजा वस्त्राकार, तानिया भाटिया
पाकिस्तान संघ : इरम जावेद, मुनीबा अली, ओमिना सोहेल, बिस्माह मारूफ, निदा दार, ए. रियाझ, आयेशा नसीम, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन, आयमान अन्वर, कैनत इम्तियाज, सादिया इक्बाल, गुल फिरोजा
दरम्यान कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदके जिंकली आहेत. अशाप्रकारे भारताने टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित केले असून सध्या ते आठव्या स्थानावर आहे. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलो गटात भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले आहे.