India vs Hong Kong : हाँगकाँगविरूद्ध सामन्यापुर्वी Team India ला मोठा धक्का

हाँगकाँग विरूद्ध सामन्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी, क्रिकेट फॅन्सला बसला मोठा धक्का 

Updated: Aug 31, 2022, 05:19 PM IST
India vs Hong Kong : हाँगकाँगविरूद्ध सामन्यापुर्वी Team India ला मोठा धक्का  title=

दुबई : युएईमध्ये सुरु असलेल्या आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) आज टीम इंडिया आणि हाँगकाँग (India vs Hong Kong) आमने सामने येणार आहेत.  हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता असतानाचं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे फॅन्सची चिंता देखील वाढलीय. त्यामुळे या घटनेत नेमकं झालंय तरी काय ते जाणून घेऊयात.    

आशिया कपमध्ये हाँगकाँग विरूद्ध सामन्यापुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान विरूद्ध सामन्यात झालेल्या त्या एका चुकीमुळे टीम इंडीयावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.आयसीसीने ही मोठी कारवाई केली आहे.

आयसीसीने भारत आणि पाकिस्तानच्या (india and pakistan) संघांना मोठा दंड ठोठावला आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ वेळेवर त्यांचे ओव्हर्स पूर्ण करू शकले नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. आयसीसीने भारत आणि पाकिस्तानच्या संघांना स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला आहे

इतका दंड ठोठावला
आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.खरं तर, 1 जानेवारी 2022 पासून, ICC ने स्लो ओव्हर रेटच्या नियमात सुधारणा लागू केली होती, ज्यामध्ये प्रत्येक संघाला कोणत्याही परिस्थितीत 85 मिनिटांच्या आत 20 षटके पूर्ण करणे बंधनकारक होते,
अशा परिस्थितीत, जर एखाद्या संघाला 85 मिनिटांत केवळ 17 षटके टाकता आली, तर उरलेल्या तीन षटकांमध्ये पाचऐवजी केवळ चार खेळाडूंना 30 यार्डच्या बाहेर उभे राहण्याची परवानगी दिली जाईल.

दरम्यान आयसीसीच्या या कारवाईने टीम इंडिया आमि पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.