Ind vs Eng : पावसामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला, पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

India vs England 1st Test Day 3rd | तिसऱ्या दिवशीही पावसाचाच खेळ, व्यत्ययामुळे 11 चेंडूनंतर गेम थांबला, टीम इंडियाचा स्कोअर किती?

Updated: Aug 6, 2021, 04:40 PM IST
Ind vs Eng : पावसामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला, पाऊस थांबण्याची प्रतीक्षा title=

नवी दिल्ली: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमधील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पाऊस थांबण्याची सर्वजण वाट पाहात आहेत. तर क्रिकेटप्रेमी पाऊस लवकर निघून जावा यासाठी प्रार्थना करत आहेत. 

पहिल्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवशीचा खेळ सुरू होताच पावसानं आगमन केलं. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. तिसऱ्या दिवशी केवळ 11 बॉल खेळून झाल्यावर खेळ पावसामुळे थांबला आहे. आतापर्यंत 4 गडी गमावून टीम इंडियाने 132 धावा केल्या आहेत. 

पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस

4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना सुरू आहे. नॉटिंघम इथे सुरू असलेल्या सामन्यात सलग दुसऱ्य़ा दिवशी पावसानं खेळ केला. त्यामुळे सामना थांबला होता. टीम इंडियाने सुरूवात चांगली केली मात्र नंतर 3 फलंदाज एकामागे एक करत संघात परतले. चेतेश्वर पुजाराने केवळ 4 धावा केल्या. जेम्स अॅण्डरसनने पुजाराला तंबुत धाडलं. त्यानंतर पुढच्याच बॉलवर कोहलीही आऊट झाला. रोहित शर्मा लंच ब्रेकआधी आऊट झाला होता. दुसऱ्या दिवस अखेर टीम इंडियाचा स्कोअर 4 बाद 125 धावा असा होता. 

पहिली कसोटी सामना दिवस पहिला

पहिल्याच दिवशी इंग्लंड संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या बॉलर्सनी आपली कमालीची कामगिरी करत इंग्लंड संघाला धावांचा डोंगर उभा करण्यापासून बरेच रोखले. शमीने 3, शार्दूलने 2 सिराजने 1 तर जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या. बुमराहने फुल फॉर्ममध्ये खेळत आपली कामगिरी केली आहे.

भारत:  रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज  

इंग्लंड: रोरी बर्न्‍स, डोमिनिक सिबली, जॅक क्रॉली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, डैनियल लॉरेंस, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम करन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅण्डरसन