India vs Australia: रवींद्र जाडेजाने Bowling आधी बोटाला काय लावलं? 'त्या' व्हिडीओवरुन Australia मध्ये गदारोळ

India vs Australia: ऑस्ट्रिलेयाविरोधातील पहिल्या कसोटी (India vs Australia Test) सामन्यात रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या फिरकीच्या जोरावर 5 गडी मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. पण या सामन्यातील एका व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जाडेजाच्या या व्हिडीओवर माजी क्रिकेटर्सही व्यक्त होत आहे.   

Updated: Feb 9, 2023, 08:15 PM IST
India vs Australia: रवींद्र जाडेजाने Bowling आधी बोटाला काय लावलं? 'त्या' व्हिडीओवरुन Australia मध्ये गदारोळ title=

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) कसोटी सामन्यातून (Test Match) भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) जोरदार पुनरागमन केलं आहे. सामन्याच्या पहिल्यात दिवशी रवींद्र जाडेजाने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे पाच गडी तंबूत धाडले. रवींद्र जाडेजाने 22 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स मिळवल्या असून ही त्याची 11 वी वेळ आहे. जाडेजाने ऑस्ट्रेलिया फलंदाजांना रोखल्याने 177 वर संघ ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रवीचंद्रन अश्विनला (R Ashwin) तीन विकेट्स मिळाल्या असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. मात्र या सामन्यादरम्यान जाडेजाच्या एका व्हिडीओमुळे वाद (Ravindra Jadeja Video Creates Controversy) निर्माण होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओत नेमकं काय आहे? 

रवींद्र जाडेजाने गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजकडून काहीतरी घेतलं आणि ते आपल्या बोटावर चोळलं. ही गोष्ट नेमकी काय होती हे त्या व्हिडीओत दिसत नाही. पण जाडेजा ती गोष्ट बोटाला लावताना स्पष्ट दिसत आहे. आता हे नेमकं काय होतं यावरुन वाद निर्माण झाला आहे. 

ऑस्ट्रेलियामधील स्थानिक प्रसारमाध्यम foxsports.com.au ने यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतामधील पहिल्या सामन्यादरम्यान प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक घटना घडली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 

इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि समालोचक मायकल वॉननेही (Michel Vaughan) यावर प्रतिक्रिया दिली आहे. "फिरकीसाठी वापरणाऱ्या आपल्या बोटावर जाडेजा काय लावत आहे? याआधी असं काही पाहिलेलं नाही", असं ट्वीट मायकल वॉनने केलं आहे. 

तसंच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने (Tim Paine) या व्हिडीओवर व्यक्त होताना "Interesting" अशी कमेंट केली आहे. 

ऑस्ट्रेलिया संघ गारद

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलिया संघ 177 धावांवर बाद झाला. दरम्यान भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधी 1 गडी गमावत 77 धावा केल्या. के एल राहुल लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने डाव सांभाळला. 

दोन्ही संघाची प्लेइंग XI

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.