गुवाहाटी : भारताविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला पाणी पाजले. भारताची ही हालत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ याने केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरचा दुसरा सामना खेळणाऱ्या या गोलंदाजाने भारतीय फलंदाजांची कंबर मोडली.
आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये जेसनने दोन खेळाडूंना बाद केले. त्यात विशेष करून विराट कोहलीचा क्रमांक लागतो.
जेसनने आपल्या चार ओव्हरमध्ये २१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. बेहरेनडॉर्फने पहिल्यांच भारतीय फलंदाजाला अडचणीत आले नाही तर यापूर्वीही त्याने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले होते.
बेहरनडॉर्फ नाही आपला पहिला वन डे आंतरराष्ट्रीय सामना ७ ऑक्टोबर २०१७ खेळला. त्याने २०१३ मध्ये तेंडुलकर आणि राहुल द्रविड शून्यावर बाद केले आहे. त्याने हा विक्रम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केला होता.
२०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीममध्ये पर्थ स्कॉर्चर्सकडून खेळला होता. त्यावेळी सचिन मुंबई इंडिन्सकडून आणि द्रविड राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.