IND vs AUS: भारतीय संघाने अचानक 'या' खेळाडूला काढलं संघाबाहेर, करिअर संपण्याच्या मार्गावर

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली आहे. या संघात युवा खेळाडू रवी बिष्णोईला (Ravi Bishnoi) स्थान देण्यात आलेलं नाही. रवी विष्षोई दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa) शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याला संघात जागा मिळालेली नाही.   

Updated: Mar 8, 2023, 04:14 PM IST
IND vs AUS: भारतीय संघाने अचानक 'या' खेळाडूला काढलं संघाबाहेर, करिअर संपण्याच्या मार्गावर title=

India vs Australia 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिका सुरु असून चौथा सामना शिल्लक आहे. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी (World Test Championship) पात्र होण्याची संधी आहे. दरम्यान 17 मार्चपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघाचं नेतृत्व करणार असून, उर्वरित दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार असणार आहे. दरम्यान भारतीय संघात २२ वर्षीय युवा खेळाडू रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) संघात स्थान देण्यात आलेलं नाही. 

ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईचा समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे रवी बिष्णोईने भारतीय संघाकडून फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे. 6 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेला एकदिवसीय सामना हा रवी बिष्णोईचा पहिला आणि शेवटचा सामना होता. दरम्यान, सध्याच्या भारतीय संघात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांना सहभागी करुन घेण्यात आलं आहे. 

गतवर्षी रवी बिष्णोईला संघाकडून वारंवार संधी मिळत होती, पण आता मात्र त्याला संधी मिळणं बंद झालं आहे. आयपीएलमध्ये खेळताना रवी बिष्णोईने चांगली कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या आधारे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. 

आशिया कप 2022 मधील संघात रवी बिष्णोईला स्थान देण्यात आलं होतं. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. पण या स्पर्धेनंतर टी-20 संघातूनही त्याला डच्चू देण्यात आला होता. 

रवी बिष्णोईने भारतीय संघाकडून एकूण 10 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 7.9 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानविरोधात त्याने आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता. 

भारतीय संघ कसा असेल?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल और जयदेव उनादकट.