INDvsAUS LIVE: ऑस्ट्रेलियाची मजबूत सुरूवात, ऋषभकडून ख्वाजाला जीवदान

ऑस्ट्रेलियाकडून बॅटिंगसाठी मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा मैदानात  

Updated: Jan 4, 2019, 12:34 PM IST
INDvsAUS LIVE: ऑस्ट्रेलियाची मजबूत सुरूवात, ऋषभकडून ख्वाजाला जीवदान title=

सिडनी : सिडनीमध्ये सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या मॅच सीरिजच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आता संपलाय. तिसऱ्या सत्रात टीम इंडियाच्या मोहम्मद शमीनं पहिली ओव्हर आपल्या हाती घेतली तर ऑस्ट्रेलियाकडून बॅटिंगसाठी मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा मैदानात उतरले. पहिल्याच ओव्हरमध्ये तिसऱ्याच बॉलवर ऑस्ट्रेलियाचा ओपनर मार्कस हॅरिसनं चौकार ठोकून ऑस्ट्रेलियाचं खातं उघडलं. त्यानंतर ऋषभ पंतनं उस्मान ख्वाजाची कॅच सोडत तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्याला जीवदान दिलं... यावेळी ख्वाजा खातंही उघडू शकलेला नव्हता. दिवसअखेर ऑस्ट्रेलिया २४-० (१० ओव्हर) 

भारताचा डाव घोषित

तिसऱ्या सत्रात ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजानं १८४ रन्सची भागीदारी केली... आणि टीम इंडियाचा स्कोअर ६०० च्या पुढे नेला. ऋषभनं आपले १५० रन्स पूर्ण केलेत... तर रवींद्र जडेजाही शतकाच्या उंबरठ्यावर उभा असताना बाद झाला. हा भारताला सातवा धक्का होता. रवींद्र जडेजानं ११४ बॉल्समध्ये ८१ रन्स केलेत. यामध्ये ७ फोर आणि १ सिक्सचा समावेश आहे.

जडेजा बाद झाल्यानंतर लगेचच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं डाव घोषित केला. यावेळी टीम इंडियाचा स्कोअर ७ विकेटसवर ६२२ रन्स होता. भारत : ६२२-७ (१६७.२)

ऋषभ पंतचं शानदार शतक

पुजारानंतर आज ऋषभ पंतनंही शानदार शतक ठोकलंय. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून टीम इंडियाचा स्कोअर ५०० च्या पुढे नेलाय. याआधी, दुसऱ्या सत्रात ऋषभ पंतनं १३२ व्या ओव्हरमध्ये आपल्या करिअरमधली तिसरी हाफ सेन्चुरी पूर्ण केली. पंतनं ८५ बॉल्समध्ये ५० रन्स पूर्ण केले.

याआधी, दुसऱ्या सत्रात ऋषभ पंतनं १३२ व्या ओव्हरमध्ये आपल्या करिअरमधली तिसरी हाफ सेन्चुरी पूर्ण केली. पंतनं ८५ बॉल्समध्ये ५० रन्स पूर्ण केले.

दुसऱ्या सत्रात १२३ व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचे ४०० रन्स पूर्ण झालेत. बराच वेळ मैदानावर टीकून राहिलेला चेतेश्वर पुजारा आपलं द्विशतकही आज ठोकणार असं वाटत असतानाच १९३ रन्सवर (३७३ बॉल्समध्ये) पुजारा आऊट झाला. नाथन लॉयननं आपल्याच बॉलवर कॅच झेलत पुजाराला मैदानाबाहेर जाण्यास भाग पाडलं. हा भारताला सहावा धक्का ठरला. आपल्या खेळीत पुजारानं तब्बल २२ फोर ठोकले. सध्या मैदानात ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा बॅटिंगसाठी उभे आहेत. भारत : ४२९-६ (१३३)

लंचपर्यंत टीम इंडिया ३८९ रन्सवर

लंचपर्यंत टीम इंडियाचा स्थिती मजबूत राहिली. पहिला सत्र संपेपर्यंत टीम इंडियानं चेतेश्वर पुजाराच्या शानदार बॅटिंगच्या बळावर पाच विकेट देत ३८९ रन्स बनवले. पुजारानं १८१ रन्स बनवून नाबाद राहिला. तर ऋषभ पंतनंही २४ रन्सची खेळी खेळली. लंचपर्यंत टीम इंडियानं पाचवा विकेट हनुमा विहारी (४२) च्या रुपात गमावला.

टीम इंडियानं अशा गमावल्या विकेट

लोकेश राहुल १०-१ (१.३ ओव्हर) , मयंक अगरवाल १२६-२ (३३.६ ओव्हर), विराट कोहली १८०-३ (५२.५ ओव्हर), अजिंक्य रहाणे २२८-४ (७०.२ ओव्हर), हनुमा विहारी ३२९-५ (१०१.६ ओव्हर), चेतेश्वर पुजारा ४१८-६ (१२९.६ ओव्हर), रवींद्र जडेजा ६२२-७ (१६७.२ ओव्हर्स)