कांगारूंच्या जलदगती माऱ्यासमोर टीम इंडियाची बॅटींग ठेपाळली

कांगारूंच्या तिन्ही जलदगती गोलंदाजांनी भारताचा फलंदजीचा निर्णय चुकीचा ठरवलाय.. 

Updated: Dec 6, 2018, 09:17 AM IST
कांगारूंच्या जलदगती माऱ्यासमोर टीम इंडियाची बॅटींग ठेपाळली  title=

एडिलेट : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून चार सामन्यांची कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीत आज भारतानं नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सलामीवीर के एल राहूल, मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली हे तिघेही आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झालेत. त्यानंतर ज्याच्यावर बॅटींगची मदार होती तो रोहित शर्माही 37 रन्सवर आऊट झालाय.  कांगारूंच्या तिन्ही जलदगती गोलंदाजांनी भारताचा फलंदजीचा निर्णय चुकीचा ठरवलाय.. 

राहणे आणि पुजारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तोही अपयशी ठरलाय. त्यामुळे संघाचं अर्धशतक लागण्याआधीच आघाडीचे चार फलंदाज बाद झालेत. आता सारी मदार पुजारा रोहित शर्मावर होती. पण रोहित शर्मा 37 रन्सवर असताना लेऑनच्या बॉलिंगवर हॅरिसकडे कॅच देऊन आऊट झाला.

दारूण स्थिती 

उपहाराला भारताची स्थिती 5 बाद 92 अशी दारुण स्थिती झालीय. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडनं २ तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी एक गडी बाद केलाय. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 40 ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या 5 विकेट आणि 92 रन्स झाले होते.