INDvsAUS:ऍडलेडमध्ये भारताला दुसऱ्या विजयाची संधी, कुठे-कशी पाहाल मॅच?

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होईल.

Updated: Dec 5, 2018, 05:08 PM IST
INDvsAUS:ऍडलेडमध्ये भारताला दुसऱ्या विजयाची संधी, कुठे-कशी पाहाल मॅच? title=

ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला गुरुवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होईल. ऍडलेडच्या मैदानामध्ये या सीरिजची पहिली टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. बॉलशी छेडछाड केल्यामुळे निलंबन झालेले ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ खेळताना दिसणार नाहीत. त्यामुळे ४ टेस्ट मॅचची सीरिज जिंकण्याची चांगली संधी भारताला आहे.

ऍडलेडच्या मैदानात भारतानं आत्तापर्यंत ११ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या एकाच टेस्ट मॅचमध्ये भारताला विजय मिळाला होता. १५ वर्षांपूर्वी राहुल द्रविडचं द्विशतक आणि अजित आगरकरच्या बॉलिंगमुळे या मैदानात भारत जिंकला होता. ऍडलेडमध्ये भारत ७ मॅच हारला आहे तर ३ मॅच ड्रॉ झाल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत ९४ टेस्ट मॅच झाल्या आहेत. यातल्या ४१ मॅच ऑस्ट्रेलियानं आणि २६ मॅच भारतानं जिंकल्या. भारतानं २६ पैकी ५ टेस्ट मॅच ऑस्ट्रेलियात तर उरलेल्या मॅच मायदेशात जिंकल्या.

२०१८ वर्षातला भारताचा हा तिसरा महत्त्वाचा दौरा आहे. याआधी जानेवारी महिन्यात भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा १-२नं पराभव झाला होता. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतानं इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळली. या सीरिजमध्ये भारताचा १-४नं पराभव झाला. आता भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याप्रमाणेच पहिल्या दोन्ही दोऱ्यांमध्येही भारत सीरिज जिंकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

टेस्ट सीरिजचं वेळापत्रक

पहिली टेस्ट- ६ डिसेंबर ते १० डिसेंबर, ऍडलेड - भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३० वाजता

दुसरी टेस्ट- १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर, पर्थ- भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता

तिसरी टेस्ट- २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर, मेलबर्न- भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता

चौथी टेस्ट- ३ जानेवारी ते ७ जानेवारी, सिडनी- भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता

कुठे पाहता येणार मॅच?

भारत आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या सीरिजच्या मॅच टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. सोनी सिक्सवर इंग्रजी कॉमेंट्री आणि सोनी टेन-३ वर हिंदी कॉमेंट्री असेल. तर मॅचचं ऑनलाईन स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर दिसेल.

भारतीय टीम

विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाची टीम

टीम पेन(कर्णधार), जॉस हेजलवूड, मिचेल मार्श, पॅट कमिन्स, एरॉन फिंच, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, मार्कस हॅरिस, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, पीटर सीडल, मिचेल स्टार्क, क्रिस ट्रेमन