IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!

India vs Australia, 1st Test: भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ  (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय.  

Updated: Feb 5, 2023, 09:28 PM IST
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा! title=
India vs Australia Border Gavaskar Trophy

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी (Border-Gavaskar Trophy)  मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ (Australia) आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या स्थानावर आहे तर भारतीय संघ (Team India) दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी सिरीज जिंकून पहिलं स्थान मिळवण्याचं लक्ष टीम इंडियाचं असणार आहे. मात्र, टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या 5 खेळाडूंपासून सावध रहावं लागणार आहे. (India vs Australia Border Gavaskar Trophy 5 Australian players that can create big problems for Team India Sports News)

कोण आहेत हे 5 खेळाडू?

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith):  ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार राहिलेल्या स्टीव्ह स्मिथने कसोटी सामन्यांमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. 14 सामन्यांत त्याने भारताविरुद्ध 72.58 च्या सरासरीने 1782 धावा केल्या आहेत. यावेळी त्याच्याकडून ऑस्ट्रेलियन लोकांना पुन्हा मोठ्या आशा आहेत. स्मिथ टीम इंडियाच्या मार्गामधील काटा ठरू शकतो.

मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne): जगातील नंबर 1 कसोटी फलंदाज मार्नस लॅबुशेनने भारतात कधीही कसोटी सामना खेळला नाही. मात्र, वनडेमध्ये खेळताना त्याने भारतीय गोलंदाजांना घाम फोडलाय. मार्नस खेळत राहिला तर भारतासाठी ऑस्ट्रेलियन संघाला रोखणे फार कठीण जाईल.

डेव्हिड वॉर्नर (David Warner) : |ऑस्ट्रेलियाचा सर्वात वादळी खेळाडू. भारताविरुद्ध तर वॉर्नर खोऱ्यानं धावा ओढतो. वॉर्नरला भारतात खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे वॉर्नरला बाद करणं सर्व गोलंदाजांची पहिला प्राथमिकता असेल. बॉक्सिंग डे कसोटीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावलं होतं. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चर्चा आहे.

पॅट कमिन्स (Pat Cummins): जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सने भारताविरुद्ध 10 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने 43 विकेट्स घेतल्या आहेत. कमिन्सच्या बॉलिंगचा मारा सहन करणयाची ताकद टीम इंडियाच्या खेळांडूमध्ये आहे. मात्र, कमिन्स कोणत्या क्षणी सामना पलटवण्याची क्षमता ठेवतो.

आणखी वाचा - Ravindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...

नॅथन लियॉन (Nathan Lyon): एखाद्या खेळपट्टीवर फिरकीपटू चालला तर समोरच्या संघाची काही खैर नाही. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया नॅथन लियॉनच्या रुपात हे ब्रम्हास्त्र वापरू शकतो. भारताविरुद्ध 22 कसोटी सामने खेळला आहे ज्यात त्याने 94 बळी घेतले आहेत. त्यामुळे भारताला सावध खेळ दाखवण्याची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया (India’s squad for first 2 Tests vs Australia) - 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.