IND vs NZ : टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघाची घोषणा

टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड (India Tour New Zealand 2022)  संघाची घोषणा करण्यात आली आहे.  

Updated: Nov 15, 2022, 10:47 PM IST
IND vs NZ : टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघाची घोषणा title=

कॅनबेरा : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2022) टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India Tour New Zealand 2022) आपसात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. या दोन्ही सीरिजसाठी न्यूझीलंडने संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. तर भारताने याआधीच संघाची घोषणा केली आहे. (india tour of new zealand 2022 announced squad for t 20 and odi series martin guptill and trent boult out of team)
 
न्यूझीलंडने या दोन्ही सीरिजसाठी दोन दिग्गजांना वगळलंय. मार्टिन गुप्टील (Martin Guptill) आणि  ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) या दोघांना बाहेर ठेवण्यात आलंय. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियानेही या न्यूझीलंड दौऱ्यासाठी अनुभवींना विश्रांती आणि युवांना संधी दिली आहे.

न्यूझीलंडकडून या दोन्ही सीरिजमध्ये केन विलियमसन नेतृत्व करणार आहे. तर टीम इंडियाकडून टी 20 सीरिजमध्ये हार्दिक पंड्या कॅप्टन्सीची जबाबदारी पाहणार आहे. तर शिखर धवनकडे एकदिवसीय मालिकेच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/ विकेटकीपर), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.

दरम्यान टी 20 सीरिजनंतर 25, 27 आणि 30 नोव्हेंबरला एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.   

टी 20 सीरिससाठी टीम न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सेंटनर, ईश सोढी आणि टिम साउथी. ब्लेयर टिकनर. 

वनडे सीरिजसाठी : केन विलियमसन (कप्तान), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लैथम, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, टिम साउथी.