टीम इंडियाचा खेळाडू Corona पॉझिटिव्ह, इंग्लंड विरुद्ध सामन्यात पत्ता कट?

स्टार खेळाडूला कोरोनाची बाधा, टीम इंडियाला बसणार का फटका?

Updated: Jun 21, 2022, 12:46 PM IST
टीम इंडियाचा खेळाडू Corona पॉझिटिव्ह, इंग्लंड विरुद्ध सामन्यात पत्ता कट? title=

मुंबई : टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. इंग्लड विरुद्ध कसोटी सामना सुरू होण्याआधी टीम इंडियाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडूच टीमबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड 1 जूलैपासून कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. 5 जुलैपर्यंत हा सामना खेळवला जाईल. कोरोनामुळे ही मॅच स्थगित करण्यात आली होती. आता ही मॅच पुन्हा खेळवण्यात येत आहे. 

या मॅचपूर्वी आर अश्विनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला सध्या क्वारंटाइन करण्यात आलं असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आर अश्विन भारतात असून तो इंग्लंडसाठी रवाना झाला नाही. 

16 जूनला टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडसाठी रवाना झाले होते. सध्या टीम इंडियाचे खेळाडू तिथे सराव करत आहेत. इंग्लंड दौऱ्याआधीच अश्विनीची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तो जाऊ शकला नाही. त्याच्यावर सध्या इथे उपचार सुरू आहेत. आर अश्विनचा टीम इंडियातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.