11 वर्षानंतर या देशाचा दौरा करणार टीम इंडिया

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 3 टेस्ट, 6 वनडे आणि 3 टी-20 मॅच येथे खेळले जाणार आहेत. पण त्यानंतर भारत 11 वर्षानंतर या देशात जाणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 12, 2018, 10:43 AM IST
11 वर्षानंतर या देशाचा दौरा करणार टीम इंडिया title=

मुंबई : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. 3 टेस्ट, 6 वनडे आणि 3 टी-20 मॅच येथे खेळले जाणार आहेत. पण त्यानंतर भारत 11 वर्षानंतर या देशात जाणार आहे.

2 टी-20 सामने

भारताचा लवकरच आयरलँड दौरा असणार आहे. टीम इंडिया येथे 2 टी-20 सामने खेळणार आहे. दोन्ही सामने डब्लिनमध्ये 27 आणि 29 जूनला होणार आहेत.

इंग्लंड आणि आयर्लंड दौरा

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा टी-20 सीरीजनेच सुरु होणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा पहिला टी-20 सामना 3 जुलैला मॅनचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय टीम 11 वर्षानंतर आयरलँड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाने याआधी 2007 मध्ये बेल्फास्टमध्ये  आयरलँड विरुद्ध सामना खेळला होता. हा वनडे सामना भारताने डी/एल मेथडनुसार 9 विकेटने जिंकला होता.

1 वनडे आणि 1 टी-20 सामना

टी-20 फॉर्मेटबाबत बोलायचं झासं तर आयरलँडने भारताविरुद्ध एकच सामना खेळला आहे. 2009 टी-20 वर्ल्ड कपमध्ये नॉटिंघममध्ये झालेल्या सामन्यात भारताने 8 विकेटने हा सामना जिंकला होता.