इंग्लंडचा डाव ४२३ रनवर घोषित, भारताला विजयासाठी ४६४ रनची गरज

भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टचा दुसरा डाव इंग्लंडनं ४२३ रनवर घोषित केला आहे. 

Updated: Sep 10, 2018, 09:18 PM IST
इंग्लंडचा डाव ४२३ रनवर घोषित, भारताला विजयासाठी ४६४ रनची गरज  title=

लंडन : भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टचा दुसरा डाव इंग्लंडनं ४२३ रनवर घोषित केला आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी ४६४ रनची गरज आहे. इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये ४० रनची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या इनिंगकडून एलिस्टर कूक आणि कर्णधार जो रूटनं शतक झळकावलं. एलिस्टर कूकची ही शेवटची टेस्ट होती. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या हनुमा विहारीनं बॉलिंगमध्येही शानदार कामगिरी केली. विहारीनं इंग्लंडच्या ३ बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. विहारीबरोबरच रवींद्र जडेजानंही ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीला २ विकेट मिळाल्या. बॅटिंग करतानाही हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजानं अर्धशतकं केली होती. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत ३-१नं पिछाडीवर आहे. त्यामुळे या टेस्टमध्येही पराभव झाला तर ४-१नं सीरिज गमावण्याची नामुष्की भारतीय टीमवर येणार आहे.

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x